मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : मुंबई विमानतळाची 'गोपनीय' माहिती असलेला लॅपटॉप चोरीला! ऐरोलीत कारच्या काचा फोडून चोरट्यांचा डल्ला; रबाळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai Latest Crime News : अदानी समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापकासह तिघांचे लॅपटॉप लंपास; मोबाईल लोकेशन मिळूनही पोलिसांनी वेळीच प्रतिसाद न दिल्याने चोरटे पसार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : मुंबई विमानतळाची 'गोपनीय' माहिती असलेला लॅपटॉप चोरीला! ऐरोलीत कारच्या काचा फोडून चोरट्यांचा डल्ला; रबाळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai Latest Crime News : अदानी समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापकासह तिघांचे लॅपटॉप लंपास; मोबाईल लोकेशन मिळूनही पोलिसांनी वेळीच प्रतिसाद न दिल्याने चोरटे पसार

नवी मुंबई | नवी मुंबईतील ऐरोली परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीने आपला मोर्चा आता अतिसंवेदनशील माहिती असलेल्या साहित्याकडे वळवला आहे. मुंबई विमानतळाच्या कामकाजाची अत्यंत गोपनीय माहिती असलेला लॅपटॉप आणि पासपोर्ट ऐरोली सेक्टर 10 मधून चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे चोरटे निसटल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

अदानी 'एअरपोर्ट' ग्रुपमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर) पदावर कार्यरत असलेले रमेशकुमार सुंदरम हे बुधवारी रात्री ऐरोली सेक्टर 10 मध्ये घराच्या शोधात आले होते. आपल्या मित्राची वाट पाहत असताना ते एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी आपली कार हॉटेलबाहेर रस्त्यालगत उभी केली होती. साधारण तासाभरानंतर ते परतले असता, त्यांना कारच्या मागच्या बाजूची काच फुटलेली दिसली. तपासणी केली असता कारमधील लॅपटॉपची बॅग आणि पासपोर्ट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

एकाच वेळी दोन गाड्या लक्ष्य
केवळ सुंदरम यांचीच नाही, तर त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारचीही काच फोडून चोरट्यांनी गुरुप्रसाद डांगरे, सचिन देवघरे आणि अमित साळवी यांचे लॅपटॉप व मोबाईल चोरले. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा