मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांचा सायबर 'महाठगा'वर दणका! 4 कोटींचा 'गोल्ड ट्रेडिंग' गंडा घालणारा ठाण्यातून जेरबंद; 17 राज्यांतील पोलीस होते मागावर

Navi Mumbai Latest Cyber Crime News : गुंतवणुकीच्या नावाखाली लुटले 4 कोटी 23 लाख; सायबर सेलने तांत्रिक सापळा रचून आवळल्या मुसक्या

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mira Road Cyber Crime News

Navi Mumbai Latest Cyber Crime News : गुंतवणुकीच्या नावाखाली लुटले 4 कोटी 23 लाख; सायबर सेलने तांत्रिक सापळा रचून आवळल्या मुसक्या

बेलापूर | गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली Gold Trading गुंतवणुकीवर अफाट नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची लूट करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्पेश कमलाकर शितप (47 वय) असे या आरोपीचे नाव असून, त्याने केवळ एका व्यक्तीलाच नाही तर देशातील 17 राज्यांमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. Navi Mumbai Cyber Crime

आमिष नफ्याचे, जाळे फसवणुकीचे!

फेब्रुवारी 2025 पासून या फसवणुकीच्या खेळाला सुरुवात झाली. आरोपीने सोन्याच्या व्यापारात (Gold Trading) गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन फिर्यादीला दिले होते. विविध क्लुप्त्या वापरून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडले. बघता बघता ही रक्कम 4 कोटी 23 लाख 630 रुपयांपर्यंत पोहोचली. जेव्हा परतावा मिळण्याची वेळ आली, तेव्हा आरोपीने संपर्क तोडल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

चंदणवाडीतील 'सेफ हाऊस'वरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल क्रमांक आणि ज्या बँक खात्यात पैसे वळवले गेले होते, त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी ठाण्यातील चंदणवाडी परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने या भागात सापळा रचून 28 जानेवारी 2026 रोजी कल्पेश शितपला शिताफीने ताब्यात घेतले.

देशव्यापी सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश

अटकेनंतर झालेल्या चौकशीत थक्क करणारी माहिती उघड झाली आहे. आरोपी कल्पेश शितप याचा देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये विविध सायबर गुन्ह्यांत सहभाग आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये बोगस खाती उघडून फसवणुकीचा मोठा 'नेटवर्क' तयार केला होता. हे रॅकेट देशभर पसरलेले असून, यामागे मोठे सायबर सिंडिकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कठोर कारवाई आणि आवाहन
आरोपी कल्पेश शितप याला सध्या 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या रॅकेटमधील इतर साथीदारांचा आणि फसवणुकीच्या रकमेचा शोध आता पोलीस घेत आहेत.

शेअर करा