मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik News : "सावरकरांचा अपमान सहन करणार नाही!" — दराडेंची राहुल गांधींना धमकी, महाविकास आघाडीत भूकंप

"चेहऱ्यावर काळं फासू, ताफ्यावर दगडफेक करू" — नाशिकमध्ये दराडेंची वादग्रस्त घोषणा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rahul Gandhi

"चेहऱ्यावर काळं फासू, ताफ्यावर दगडफेक करू" — नाशिकमध्ये दराडेंची वादग्रस्त घोषणा

नाशिक – वीर सावरकरांवरील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये ठिणग्या पडल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे) शहर उपाध्यक्ष बाळा दराडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, "राहुल गांधी नाशिकमध्ये आले, तर त्यांच्या चेहऱ्यावर काळं फासू. हे शक्य नसलं तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू."

ही धमकी त्यांनी सावरकर जयंती निमित्त बोलताना दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं,"सावरकरांविषयी अपशब्द सहन केला जाणार नाही, मग त्यासाठी महाविकास आघाडीचा बळी गेला तरी चालेल."दराडेंच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी आघाडीत फूट पडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

"धमकीचं राजकारण बंद करा" — काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया, आघाडीत तणाव

दराडेंच्या विधानावर पक्ष प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटलं, "ही पक्षाची भूमिका नाही, ही दराडे यांची वैयक्तिक भावना आहे."

तथापि, काँग्रेसने या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं, "राहुल गांधींचे वडील राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं. आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नाही."

दराडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे एकीकडे सावरकरप्रेमींमध्ये उत्साह दिसून आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील विश्वासाला तडे गेले आहेत. पुढील काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद किती खोलवर उमटतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Parinay Fuke : भाजप नेते परिणय फुके यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, सुन प्रिया फुकेचे गंभीर आरोप

शेअर करा