मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik News : 'झाडे वाचवा, तपोवन वाचवा' - मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून नाशिकमध्ये जोरदार आंदोलन!

Actor Santosh Juvekar : 1800 हून अधिक वृक्षतोडीच्या निर्णयाला मनसेचा तीव्र विरोध; अभिनेता संतोष जुवेकर यांचा प्रशासनाला भावनिक 'पर्याय निवडा' विनंती; राजकीय वातावरण तापले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nashik News : 'झाडे वाचवा, तपोवन वाचवा' - मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून नाशिकमध्ये जोरदार आंदोलन!

Actor Santosh Juvekar : 1800 हून अधिक वृक्षतोडीच्या निर्णयाला मनसेचा तीव्र विरोध; अभिनेता संतोष जुवेकर यांचा प्रशासनाला भावनिक 'पर्याय निवडा' विनंती; राजकीय वातावरण तापले

नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन येथील 1800 हून अधिक वृक्ष तोडण्याच्या प्रशासकीय निर्णयाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) जोरदार एल्गार पुकारला आहे. आज मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवन येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

'झाडे वाचवा, तपोवन वाचवा' अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेत्याची भावनिक विनंती

अभिनेते संतोष जुवेकर यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी प्रशासनाला भावनिक विनंती केली की, प्रशासनाने दुसरा पर्याय निवडून 'वृक्षहत्या रोखावी'.

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला यापूर्वी पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता. आता मनसेसारखे राजकीय पक्षही मैदानात उतरल्याने या तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

शेअर करा