मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik News : नाशिकमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेतच राडा; दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद

• Nashik Shiv Sena UBT MNS Meeting विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून वाद चिघळला; विनायक पांडे संतापून बैठकीतून बाहेर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nashik News : नाशिकमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेतच राडा; दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद

• Nashik Shiv Sena UBT MNS Meeting विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून वाद चिघळला; विनायक पांडे संतापून बैठकीतून बाहेर

नाशिक :- राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोर धरत असताना, आज नाशिकमध्ये याच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या रणनीतीवर झालेल्या वादावादीमुळे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी बैठकीतून संतापून काढता पाय घेतला. या घटनेमुळे शहराच्या राजकारणात सध्या या 'राड्याची' जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिकमधील शिवसेना कार्यालयात मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील खड्डे, गुन्हेगारी, पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान, ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी नाशिकमधील गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर आपले मत मांडताना, 'प्रचारादरम्यान एमडी ड्रग्ज सारखे मुद्दे चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने वसंत गीते यांचा पराभव झाला,' असे म्हटले.

जयंत दिंडे यांच्या या विधानामुळे वसंत गीते यांचे निकटवर्तीय विनायक पांडे संतापले. त्यांनी लगेच उभे राहून, "जर आम्ही 40 वर्षांपासून लढा देत होतो, तर आम्ही नेमके काय केले?" असा सवाल उपस्थित केला. कारण, त्या निवडणुकीतील प्रचाराची धुरा वसंत गीते आणि विनायक पांडे यांनी एकत्रित सांभाळली होती.

वाद वाढल्यानंतर जयंत दिंडे यांनी तात्काळ माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र विनायक पांडे यांचा संताप कमी झाला नाही. ते बैठकीतून बाहेर पडले, तर जयंत दिंडे बैठकीतच थांबले. एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये झालेल्या या वादामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Bank Fraud Pune : पुण्यात बँकेची 11 कोटींची फसवणूक; खोट्या ‘एनओसी’चा वापर

शेअर करा