मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik Gas News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर मोठा प्रहार; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा दाखल

Nashik Latest Gas News Update : गॅस टंचाईचा फायदा घेणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर; सातपूर परिसरात रात्री उशिरापर्यंत राबवली धडक मोहीम

V
Vivek

2 मिनिट वाचन

Nashik Gas News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर मोठा प्रहार; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा दाखल

Nashik Latest Gas News Update : गॅस टंचाईचा फायदा घेणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर; सातपूर परिसरात रात्री उशिरापर्यंत राबवली धडक मोहीम

नाशिक :- आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फायदा घेत नाशिकमध्ये सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पोलिसांनी सातपूर परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सातपूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मध्यरात्री 'नाईस' संकुलावर छापा

नाशिक शहरात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत असतानाच, काही ठिकाणी छुप्या पद्धतीने काळाबाजार सुरू असल्याची कुणकुण जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना लागली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांच्या पथकाने सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत संशयास्पद रितीने उभी असलेली वाहने आणि सिलिंडरचा मोठा साठा आढळून आला.

447 सिलिंडर आणि वाहने ताब्यात
या धडक कारवाईत पोलिसांनी केवळ सिलिंडरच नव्हे, तर त्यांची ने-आण करणारी मोठी वाहनेही जप्त केली आहेत:

सिलिंडर साठा: 158 भरलेले आणि 289 रिकामे असे एकूण 447 सिलिंडर जप्त करण्यात आले.

वाहने: एक मोठा ट्रक आणि दोन छोटे टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

मुद्देमाल: जप्त केलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत 25 लाख रुपयांच्या घरात आहे.

एजन्सी चालकाचा दावा आणि पोलिसांचा तपास

संबंधित गॅस एजन्सी चालकाने हा काळाबाजार नसून नियमित वाहतूक असल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी अशा प्रकारे होणाऱ्या वाहतुकीमुळे आणि टंचाईच्या काळात साठेबाजीच्या संशयामुळे पुरवठा विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात या संकटाच्या काळात नोंदवला गेलेला हा काळाबाजाराचा पहिलाच गुन्हा आहे.

जिल्हाभर तपासणी सत्र सुरू

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील 135 गॅस वितरकांची तपासणी केली जात असून, पहिल्याच दिवशी 12 ठिकाणी पाहणी करण्यात आली. विशेषतः हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा अवैध वापर होतोय का, हे तपासण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्राहकांना बुकिंगनंतर 2 ते 3 दिवसांत सिलिंडर मिळवून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा