मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik Bribe News : "साहेबांसाठी लाच द्या!" – म्हणताच सापळा पडला, हवालदार रंगेहाथ गजाआड!

• लाच मागणीप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police Hawaldar Bribe News

•लाच मागणीप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला! चॉकलेट व्यापाऱ्याला वीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत विभागाची कारवाई

नाशिक :– अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने चक्क "साहेब" म्हणत चॉकलेट बिस्किट व्यवसाय करणाऱ्या नागरिकाकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत उमाकांत रंगनाथ टिळेकर (वय 39) रंगेहाथ अडकला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराच्या व्यवसायासंबंधी दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा नोंदवू नये म्हणून हवालदाराने पैसे मागितले होते. याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळताच पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला आणि पडताळणी केली.पंचांसमक्ष तपासणीदरम्यान टिळेकर यांनी स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रभाव वापरून वीस हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या मोबाईलचा तपास केला जात असून घरझडतीही सुरू आहे.स्पष्ट पुराव्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई करत टिळेकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 आणि 7A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,पोलीस उप अधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस हवालदार अनिल गांगोडे यांच्यासह पार पडली.

हेही वाचा: IPL 2025 Update : 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबई इंडियन्स दमदार विजय, गुजरात टायटन्सला ,20 धावांनी हरवून क्वालिफायरमध्ये धडक

शेअर करा