मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nanded Thackeray Group: नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी शिवसेना ठाकरेंची साथ सोडली

Nanded Thackeray Shivsena Group Joined Shinde Group : शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये भगदाड, असंख्य कार्यकर्ते आणि प्रमुख नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश

V
Vivek

2 मिनिट वाचन

Nanded Thackeray Group: नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी शिवसेना ठाकरेंची साथ सोडली

Nanded Thackeray Shivsena Group Joined Shinde Group : शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये भगदाड, असंख्य कार्यकर्ते आणि प्रमुख नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाला नांदेड Nanded Thackeray Group जिल्ह्यात भगदाड पडल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नेते यांनी असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेना शिंदे Shivsena Shinde Group गटात प्रवेश केला आहे.नांदेड जिल्ह्यातील मुखेड-कंधार आणि देगलूर-बिलोली येथील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी तसेच दोनशेहून अधिक गावांचे सरपंच, उप सरपंच आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच यांनी काल (29 ऑगस्ट) शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यामध्ये डॉ.अंकुश देवसरकर, मधुकर गिरगावकर, सुभाष काटे, शंकर पाटील, अजित पाटील, अशोक पाटील, काशिनाथ पाटील, आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, गेल्या दोन वर्षात राज्यातील महायुती सरकारच्या कामाने प्रभावित होऊन अनेक जण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक निर्णय हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील प्रत्येक घटकातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला भगिनींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तसेच युवकांना मुख्यमंत्री युवा कौशल्यविकास योजनेच्या माध्यमातून दरमहा 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनेचा लाभ देण्यात येणार असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून या योजना लोकांच्या घरोघरी पोहचवा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

दुसरीकडे जालना आणि नांदेड हा भाग आपण समृद्धी महामार्गाला जोडणार असून त्यामुळे भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. हिंगोली येथे 100 कोटी खर्च करून हळद संशोधन केंद्र तयार करत असून त्याचा लाभ हळद उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या या भागाचा विकास सरकारच्या माध्यमातून नक्की होईल अशी ग्वाही यासमयी दिली.

यावेळी शिवसेनेचे बालाजी पाटील खतगावकर, शिवसेना प्रवक्ते आणि मुखेड-कंधार विधानसभा निरीक्षक संजीव भोर- पाटील शिवसेना प्रवक्त्या सौ.ज्योती वाघमारे, प्रभारी संजय काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंदराव बोढारकर
तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Uddhav Thackeray : कोलकाता बलात्कार-हत्याप्रकरणी राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शेअर करा