मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopra Murder News : नालासोपार्‍यात क्षुल्लक वादातून नायजेरियन नागरिकाची हत्या; डोक्यात काचेची बाटली फोडल्याने जागीच मृत्यू

Nalasopra Nigerian Man Murder News : प्रगतीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री घडली घटना, दोन आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Faizan Shaikh,Bakri Eid stabbing,mobile theft suspicion,Wadala TT Police,Asif Khan,Mohammad Hasnain,attempt to murder,Lokmanya Tilak Hospital,Bharatiya Nyaya Sanhita (BNS)

Nalasopra Nigerian Man Murder News : प्रगतीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री घडली घटना, दोन आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक

नालासोपारा :- मुंबईजवळच्या नालासोपारा शहरात शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नायजेरियन नागरिकाची क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात काचेची बाटली फोडल्याने लकी इकेचकव उईजे (32 वय) या नायजेरियन नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे. Nalasopra Latest Crime News

नेमकं काय घडलं?

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात नायजेरियन नागरिकांची मोठी वस्ती आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अयूला बाबाजिदे बार्थलोम (50 वय), ओघेने इगेरे (47 वय) आणि ओडिया इझू पेक्यूलिअर (50 वय) हे तिघे मित्र एका किराणा दुकानाजवळ उभे होते. त्याच वेळी त्यांचा परिचित लकी उईजे तिथे आला. काही वेळातच त्यांच्यात एका क्षुल्लक गोष्टीवरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनी मिळून लकीच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपी - अयूला बाबाजिदे आणि ओघेने इगेरे यांना अटक केली आहे. मात्र, ओडिया इझू पेक्यूलिअर हा तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस त्याच्या शोधासाठी विविध पथके तयार करून तपास करत आहेत. नालासोपार्‍यात परदेशी नागरिकांमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शेअर करा