मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopra Murder News : खुनाच्या हत्यातील आरोपी सहा वर्षांपासून फरार, तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई आरोपीला जेरबंद

Nalasopra Murder News : खून करून फरार असलेला आरोपी सहा वर्षानंतर पोलिसांनी केली अटक, तुळींज गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई

V
Vivek

2 मिनिट वाचन

Nalasopra Murder News : खुनाच्या हत्यातील आरोपी सहा वर्षांपासून फरार, तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई आरोपीला जेरबंद

Nalasopra Murder News : खून करून फरार असलेला आरोपी सहा वर्षानंतर पोलिसांनी केली अटक, तुळींज गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई

नालासोपारा :- मोरेगावच्या मौर्या नगर येथील नागरिक कॉलनीत राहणाऱ्या प्रवीण उर्फ सोनू साखरिया (22 वर्ष) याची 3 मे 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. धारदार शस्त्राने चार आरोपींनी प्रवीण याची हत्या केली होती.त्यांचा मृतदेह 90 फुटी रोडच्या कडेला मिळाला होता. पूर्ववैमान्यातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात होते. या हत्या मधील पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींना जेरबंद केले होते. परंतु चौथा आरोपी हा मागील सहा वर्षांपासून फरार होता. आता त्याने आपले अस्तित्व बदलून तो शहरात वावरत होता. त्यामुळे पोलिसांना आरोपीला शोधणे अवघड झाले होते. परंतु तुळींज गुन्हे प्रकटीकरण विभागाने सहा वर्षापासून फरार असलेला चौथ्या आरोपीला अटक केली आहे.

तुळींज पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादवि 302,364,201,34 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे तपासात आरोपी भरत राय (25 वर्ष), आशिष कुलकर्णी (21 वर्ष), निशांत मिश्रा ऊर्फ मोनु रायडर (29 वर्ष) आणि प्रिन्स सिंग ऊर्फ पोगो यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी भरत, आशिष आणि निशांत या तिघांना तात्काळ अटक केली होती. पण गुन्हा घडल्यापासून आरोपी प्रिन्स हा फरार होता. याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले होते.

तेव्हापासून पाहिजे आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून विरार, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई येथे वास्तव्य करत असल्याचे बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती. या आरोपीचा माग काढत असताना गुरुवारी संध्याकाळी विरार कातकरी पाडा येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे यांना मिळाली होती. वरिष्ठांना माहिती देऊन त्या ठिकाणी तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रिन्सला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी आरोपीला अटक केले आहे.

पोलीस पथक

पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, राजेंद्र जाधव, अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, इस्माईल छपरीबन, राहुल कदम, शशिकांत पोटे, बागुल, अमोल बर्डे यांनी केली आहे.

शेअर करा