मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopara Crime News : तडिपार 'गांजा राणी' जाळ्यात! – गुन्हे शाखा कक्ष-3 ची फिल्मी शैलीतील कारवाई

•8 लाखांचा गांजा आणि दोन वर्षांसाठी हद्दपार असलेली आरोपी – एकाच वेळी दोन गुन्हे उजेडात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nalasopara Crime News : तडिपार 'गांजा राणी' जाळ्यात! – गुन्हे शाखा कक्ष-3 ची फिल्मी शैलीतील कारवाई

•8 लाखांचा गांजा आणि दोन वर्षांसाठी हद्दपार असलेली आरोपी – एकाच वेळी दोन गुन्हे उजेडात

नालासोपारा | विरार शहरात शुक्रवार सायंकाळी एखाद्या चित्रपटातील दृश्य घडल्याचा प्रत्यय आला, जेव्हा पोलिसांनी एका तडिपार 'गांजा राणी'ला 20 किलोहून अधिक अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले. 7 जून 25, वेळ सायंकाळच्या सुमारास नालासोपारा येथील लिंक रोड, स्टार अपार्टमेंटजवळ. एक रिक्षा मिरारोडहून नालासोपारा दिशेने भरधाव चालली होती. तिच्याविषयी गुन्हे शाखा कक्ष-3 च्या एपीआय सुहास कांबळे यांना गुप्त बातमी मिळाली होती – "एक महिला उग्रवासाच्या वासासह गांज्याचा मोठा साठा घेऊन निघाली आहे!"

त्यानुसार पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तयार झाले. दोन पंचासह सापळा रचण्यात आला आणि ती संशयित रिक्षा थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान महिलेची ओळख शारदा ऊर्फ कुडी गोपी बंजारा (वय 43, रा. अल्कापुरी, नालासोपारा पूर्व) अशी झाली.

तिच्या बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांच्या नजरेसमोर एकदम धक्का बसला – 8 लाख 6 हजार 840 रुपये किंमतीचा तब्बल 20 किलो 171 ग्रॅम गांजा त्या बॅगेतून सापडला!

या थरारात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली – ही महिला महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत पालघर जिल्ह्यातून तडिपार होती! तरीही ती परत परिसरात आली आणि अंमली पदार्थांची तस्करी करत होती.

या दुहेरी गुन्ह्याच्या प्रकरणात, पोलीस शिपाई आतिश पवार यांनी सरकारतर्फे नालासोपारा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा आणि तडिपार आदेशाचे उल्लंघन या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

न्यायालयाने आरोपीस 12 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास अधिकाधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या थरारात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली – ही महिला महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत पालघर जिल्ह्यातून तडिपार होती! तरीही ती परत परिसरात आली आणि अंमली पदार्थांची तस्करी करत होती.

शेअर करा