मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : दोन आरोपींकडून १४ मोबाईल जप्त

Pune News : पुणे : मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींकडून दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल संच जप्त करण्यात आले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दोन आरोपींकडून १४ मोबाईल जप्त मुंढवा पोलिसांची कारवाई; चोरीतील दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
दोन आरोपींकडून १४ मोबाईल जप्त मुंढवा पोलिसांची कारवाई; चोरीतील दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Pune News : मुंढवा पोलिसांची कारवाई; चोरीतील दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Pune News : पुणे : मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींकडून दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल संच जप्त करण्यात आले. प्रणित नरेंद्र जाधव (वय २०) आणि राहुल सुरेश सहाणी (वय २२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रणित जाधव हा मुंढव्यातील सर्वोदय कॉलनी परिसरात, तर राहुल सहाणी हा खराडीतील चौधरी गोठ्याजवळील थिटे वस्ती येथे राहतो. मुंढवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासात ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपींकडून चोरीचे १४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांची एकूण किंमत दोन लाख २७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार विनोद साळुंके करीत आहेत. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कारवाई केली.https://maharashtramirror.com/ Pune News

कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक तसेच पोलिस अंमलदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रूपेश तोडकर, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर आणि अक्षय धुमाळ सहभागी झाले.

शेअर करा