मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबईची लाईफलाईन पाण्याखाली: मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत ,माटुंगा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

Mumbai Rain Latest News : कल्याण पुढे तांत्रिक बिघाड, घाटकोपर स्टेशनबाहेरही पाणी साचले; चाकरमान्यांची मोठी गैरसोय

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबईची लाईफलाईन पाण्याखाली: मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत ,माटुंगा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

Mumbai Rain Latest News : कल्याण पुढे तांत्रिक बिघाड, घाटकोपर स्टेशनबाहेरही पाणी साचले; चाकरमान्यांची मोठी गैरसोय

मुंबई :- मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, आज सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. Mumbai Rain Update

लोकल सेवांवर मोठा परिणाम

मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेषतः, माटुंगा रेल्वे स्थानकातील ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलही 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच, एरवी फारसा परिणाम न होणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गालाही पावसाचा फटका बसला असून, या मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, सर्वांना गाड्यांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे.

तांत्रिक बिघाड आणि सखल भागांत पाणी

पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर इतके पाणी साचले आहे की प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणेही अवघड झाले आहे. याशिवाय, कल्याणच्या पुढे शहाड आणि आंबिवली स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने कसारा, आसनगाव आणि टिटवाळ्याहून येणाऱ्या लोकल सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेनेही नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा