मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून मुंबईत 15 टक्के पाणी कपात

उद्या (20 मार्चला) ठाण्यात बारा तासासाठी पाणी बंद, ठाणेकरांना पाणी भरून ठेवा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून मुंबईत 15 टक्के पाणी कपात

  • उद्या (20 मार्चला) ठाण्यात बारा तासासाठी पाणी बंद, ठाणेकरांना पाणी भरून ठेवा
  • मुंबई :- उन्हाचा तडाका आणि यंदाच्या हंगामात कमी पाऊस झाल्यामुळे धरणे 100% न भरल्यामुळे महानगरपालिकेने उपाययोजना म्हणून पाणी कपातीचे धोरण स्वीकारले आहे मुंबईत आजपासून १५ टक्के पाणी कपात लागू केले असून उद्या ठाण्यात बारा तासासाठी पाणी बंद राहणार आहे त्यामुळे ठाणेकरांनो पाणी जपून वापरा तसेच आजच पाणी भरून ठेवा असे आव्हान महानगरपालिकेकडून ठाणे शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे.बुधवारी 20 मार्च 2024 ला ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेतल्यामुळे 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरात होणाऱ्या पाणी पुरठ्यात 30 टक्के कपात होणार आहे. त्यात शहराच्या काही भागात बुधवारी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्याशिवाय पाणी पुरवठा पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांवर पाणी टंचाईचं संकट ऐन उन्हाळ्यात ओढवलंय. Mumbai Water Cut

    ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा 250 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा बुधवारी जलवाहिनी स्थलांतरित कामासाठी बंद ठेवणार आहेत. त्यामुळे शहरात 30 टक्के कमी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बुधवार, 20 मार्चला सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केलंय. Mumbai Water Cut

    शेअर करा