मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Raid News : मुंबईसह आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रामी हॉटेल ग्रुप'वर आयकर विभागाचे छापे! - करचोरी प्रकरणात राज शेट्टींच्या 30 हून अधिक ठिकाणांवर सर्च ऑपरेशन

Rami Hotel Raid News : दादरसह बहरीन, दुबई, ओमानमध्येही ग्रुपचे हॉटेल्स; पहाटेपासूनच तपास सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Raid News : मुंबईसह आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रामी हॉटेल ग्रुप'वर आयकर विभागाचे छापे! - करचोरी प्रकरणात राज शेट्टींच्या 30 हून अधिक ठिकाणांवर सर्च ऑपरेशन

Rami Hotel Raid News : दादरसह बहरीन, दुबई, ओमानमध्येही ग्रुपचे हॉटेल्स; पहाटेपासूनच तपास सुरू

मुंबई :- मुंबईतील प्रसिद्ध रामी हॉटेल Rami Hotel ग्रुप आणि त्याचे अध्यक्ष राज शेट्टी Raj Sheety यांच्याशी संबंधित देशभरातील 30 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाने (Income Tax Department) आज पहाटेपासून मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. करचोरीच्या संशयावरून ही छापेमारी सुरू असून, दादरमधील रामी हॉटेलबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कारवाईचे मुख्य कारण

रामी हॉटेल ग्रुप आणि त्याच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर करचोरी झाल्याच्या संशयावरून आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. या छापेमारीतून अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रे समोर येण्याची शक्यता आहे.

रामी हॉटेल ग्रुपची व्याप्ती

आंतरराष्ट्रीय समूह: राज शेट्टी यांनी 1985 मध्ये रामी हॉटेल ग्रुपची स्थापना केली. सध्या ते या ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय कामगार आहेत.

आंतरराष्ट्रीय उपस्थिती: या ग्रुपचे हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि अपार्टमेंट्स केवळ भारतातच नव्हे, तर बहरीन, दुबई आणि ओमान यांसारख्या आखाती देशांमध्येही आहेत.

मोठा व्यवसाय: रामी ग्रुपचे भारत आणि आखाती देशात एकूण 52 हॉटेल्स कार्यरत आहेत. राज शेट्टी यांनी 'फोर्ब्ज मिडल ईस्ट मॅगझिन'च्या 'युएईमधील टॉप 100 भारतीय लीडर्स'च्या यादीतही स्थान मिळवले आहे.

राज शेट्टी आणि ग्रुपशी संबंधित इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर आयकर विभागाने छापे टाकले असून, या सर्च ऑपरेशनमधून काय निष्पन्न होते, याकडे उद्योजक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शेअर करा