मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police News : मुंबई पोलिसांची 'फरारी शोध मोहीम' यशस्वी! - परिमंडळ-04 अंतर्गत काही दशकांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील 04 आरोपी जेरबंद!

Mumbai Police Arrested Wanted Criminal: 20 ते 37 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना ठाणे, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथून अटक; न्यायालयीन वॉरंटनंतर मोठी कारवाई

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Police News : मुंबई पोलिसांची 'फरारी शोध मोहीम' यशस्वी! - परिमंडळ-04 अंतर्गत काही दशकांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील 04 आरोपी जेरबंद!

Mumbai Police Arrested Wanted Criminal: 20 ते 37 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना ठाणे, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथून अटक; न्यायालयीन वॉरंटनंतर मोठी कारवाई

मुंबई :- मुंबईतील परिमंडळ-04 अंतर्गत राबविण्यात आलेल्या 'फरारी आरोपी शोध मोहीमे'ला मोठे यश मिळाले आहे. Mumbai Police Latest News या मोहिमेत काही दशकांपासून गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. Mumbai Police News

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

फरार आरोपी आणि त्यांच्या अटकेची कहाणी

37 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
भोईवाडा पोलीस ठाणे येथे दिनांक 16/11 रोजी दादर येथील मिठवाला चाळीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोख रक्कम घेऊन पळून जाण्याच्या गुन्ह्यातील आरोपी नफीज अब्दुल अजिज शेख (वय 61) हा फरार होता. गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेतला असता, तो पुणे येथील घोडेगाव येथे राहत असल्याचे आढळले. चौकशीनंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

20 वर्षांपासून फरार आरोपी ठाण्यात सापडला

र.अ. कि. मार्ग पोलीस ठाणे मध्ये 2005 मध्ये दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात (कलम 399, 4026भादंवि) आरोपी जावेद युसूफ शेख (वय 48 वर्षे) याला जामीन मिळाल्यानंतर तो सत्र न्यायालयात हजर राहत नव्हता. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. गोपनीय बातमीनुसार आरोपी ठाणे शहरामध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाल्यावर दि. 20/11 रोजी त्याला ठाणे शहरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

25 वर्षांपासून फरारीचा साताऱ्यात शोध

काळाचौकी पोलीस ठाणे मध्ये 1992 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी विलास गणपत घोरपडे हा मागील 25 वर्षांपासून न्यायालयाच्या तारखेस हजर राहत नव्हता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध स्थायी अटक वॉरंट जारी केले होते. आरोपी हा सातारा येथे भाड्याने राहत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावर दि. 18/11 रोजी त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

11 वर्षांपासून फरारी कोल्हापुरातून ताब्यात

काळाचौकी पोलीस ठाणे येथे 2014 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश अमृतलाल पासी हा तेव्हापासून फरार होता. त्याचा शोध त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात घेण्यात आला, परंतु तो कोल्हापूर जिल्हयात गेला असल्याची माहिती मिळाल्यावर दि.26/11 रोजी त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

शेअर करा