मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police : मुंबई पोलिसांची 'स्पेशल 59' मोहीम! 42 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीसह 'या' चौघांना बेड्या; परिमंडळ 3 ची मोठी कारवाई

Mumbai Police Latest Crime I न्यायालयाच्या वॉरंटची अंमलबजावणी करत तब्बल 138 आरोपींना शोधले; 29 वर्षांहून अधिक काळ गायब असलेल्या आरोपींचाही समावेश; मुंबई पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police : मुंबई पोलिसांची 'स्पेशल 59' मोहीम! 42 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीसह 'या' चौघांना बेड्या; परिमंडळ 3 ची मोठी कारवाई

Mumbai Police Latest Crime I न्यायालयाच्या वॉरंटची अंमलबजावणी करत तब्बल 138 आरोपींना शोधले; 29 वर्षांहून अधिक काळ गायब असलेल्या आरोपींचाही समावेश; मुंबई पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक

मुंबई :- बृहन्मुंबई पोलीस Mumbai Police आयुक्तालयांतर्गत परिमंडळ ३ मधील पोलीस ठाण्यांनी गुन्हेगारांचा काळ बनत एक धाडसी मोहीम फत्ते केली आहे. गंभीर गुन्हे करून गेल्या 29 ते 42 वर्षांपासून फरार असलेल्या आणि न्यायालयाच्या वॉरंटला जुमानणाऱ्या चार कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत केवळ जुन्या केसेसमधील आरोपीच नव्हे, तर एकूण 59 जामीनपात्र आणि 79 अजामीनपात्र वॉरंटची यशस्वी बजावणी करण्यात आली आहे. Mumbai Police Latest News

तब्बल 42 वर्षांचा वनवास संपला; भायखळा पोलिसांची कामगिरी

या कारवाईतील सर्वात मोठे यश म्हणजे भायखळा पोलीस ठाण्यातील एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला झालेली अटक. मोहम्मद उर्फ सलीम अब्दुल दोराजीवाला (सत्तार) हा 1985 मधील कलम 307 (हत्येचा प्रयत्न) सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता. गेल्या 42 वर्षांपासून तो पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत होता. मात्र, 27 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या.

ना.म. जोशी मार्ग आणि आग्रीपाडा पोलिसांचा दणका

ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी 38 वर्षांपासून फरार असलेल्या गणेश भिमय्या विमुला (58 वय) याला 2 जानेवारी रोजी अटक केली, तर 1997 पासून गायब असलेल्या संतोष नामदेव शिर्के (52 वय) याला 26 फेब्रुवारी रोजी जेरबंद केले. तसेच, आग्रीपाडा पोलिसांनी 1995 च्या बलात्कार (कलम 376) प्रकरणातील आरोपी रविकांत उर्फ रवि सखाराम नेरूरकर (54 वय) याला तब्बल 31 वर्षांनंतर 18 फेब्रुवारी रोजी अटक केली.

न्यायालयीन वॉरंटची जोरदार बजावणी

पोलीस आयुक्तालयाने न्यायालयाकडून आलेल्या स्थायी अजामीनपात्र वॉरंटची गांभीर्याने दखल घेत ही विशेष मोहीम राबवली होती. परिमंडळ-3 अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी दिवस-रात्र एक करून आरोपींच्या लपण्याच्या जागांचा शोध घेतला. ज्या आरोपींना वाटले होते की पोलीस आता आपल्याला विसरले असतील, त्यांच्या घरापर्यंत पोहोचून पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून दिला आहे.

शेअर करा