मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police : मुंबई पोलिसांचा मोठा उपक्रम! 1.91 कोटींचा मुद्देमाल मालकांना परत; परिमंडळ-7 मधील 1087 मोबाईल आणि 23 तोळे सोने हस्तांतरित

Mumbai Police Latest Crime News : पोलीस आयुक्त देवेन भारती यांची संकल्पना; घाटकोपर ते मुलुंडमधील 8 पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे कौतुक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police : मुंबई पोलिसांचा मोठा उपक्रम! 1.91 कोटींचा मुद्देमाल मालकांना परत; परिमंडळ-7 मधील 1087 मोबाईल आणि 23 तोळे सोने हस्तांतरित

Mumbai Police Latest Crime News : पोलीस आयुक्त देवेन भारती यांची संकल्पना; घाटकोपर ते मुलुंडमधील 8 पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे कौतुक

मुंबई (मुलुंड) :- मुंबई पोलीस दलाने सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारा एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या संकल्पनेतून, परिमंडळ-7 मधील विविध गुन्ह्यांत चोरीला गेलेला आणि पोलिसांनी हस्तगत केलेला तब्बल 1 कोटी 91 लाख 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. Mumbai Police Latest Crime News

कोट्यवधींच्या मालमत्तेचे वाटप

काल 13 मार्च 2026 रोजी मुलुंड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात या मालमत्तेचे वाटप करण्यात आले. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते फिर्यादी आणि तक्रारदारांना त्यांचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. यामध्ये खालील मुद्देमालाचा समावेश होता:

मोबाईल फोन्स: 1087 नग (चोरीला गेलेले व गहाळ झालेले)

सोन्याचे दागिने: 23 तोळे

चांदी: 02 किलो

इतर: मोठी रोख रक्कम

8 पोलीस ठाण्यांची एकत्रित कामगिरी

परिमंडळ-७ अंतर्गत येणाऱ्या घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, भांडुप, कांजुरमार्ग, मुलुंड आणि नवघर या आठ पोलीस ठाण्यांनी जबरी चोरी, घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून हा मुद्देमाल जप्त केला होता. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मालमत्ता हस्तगत केली होती, जी आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकांना सोपवण्यात आली.

फिर्यादींनी मानले पोलिसांचे आभार

आपले हक्काचे दागिने आणि कष्टाचे पैसे पुन्हा मिळाल्याने उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. अनेक महिने किंवा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणातील मालमत्ता परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर समाधान व्यक्त करत त्यांचे जाहीर आभार मानले.

शेअर करा