मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police In Action Mode : मुंबईत “थ्री चेन स्नॅचर्स” टोळीचा भांडाफोड; 24 तासांत पोलिसांची धडक कारवाई!

Mumbai Police Take Action Against Chain Snatcher : सोनसाखळी हिसकावून दुचाकीवर पसार!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Police In Action Mode: “Three Chain Snatchers” gang busted in Mumbai; Police take drastic action within 24 hours!
Mumbai Police Latest News

Mumbai Police Take Action Against Chain Snatcher : सोनसाखळी हिसकावून दुचाकीवर पसार! घाटकोपर-मुलुंड पोलिसांच्या तडाख्यात तिघे जेरबंद,मुख्य आरोपीवर तब्बल 8 गुन्हे; उत्तर भारतातून मुंबईत येत चोरी करायचा मास्टर प्लान उघड

मुंबई :- मुंबईच्या रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत घाटकोपर आणि मुलुंड पोलिसांनी केवळ 24 तासांत एक धडाकेबाज कारवाई करून तीन कुख्यात आरोपींना अटक केली आहे. Mumbai Police Take Action Against Chain Snatcher ही कामगिरी एखाद्या थ्रिलर सिनेमाला शोभेल अशी असून, यामध्ये स्थानिक गुन्हेगारांसह उत्तर भारतातील आरोपींचाही समावेश आहे. Mumbai Police Latest News

30 मे रोजी सकाळच्या सुमारास, घाटकोपर पूर्वेतून एक महागडी दुचाकी चोरी झाली आणि त्याच दिवशी मुलुंडमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी झडपडण्यात आली. या दोन वेगवेगळ्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली होती.पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबर्‍यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत डॉरमेटरीत लपलेल्या टोळीला मस्जिद बंदर परिसरातून जेरबंद केलं.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं पुढीलप्रमाणे आहेत:

  • प्रेशित चंद्रकांत नार्वेकर (52 वय) — मुंबईतील सराईत गुन्हेगार
  • हरजीत सिंग (35 वय) — गाझियाबाद, उत्तर प्रदेश
  • सतपाल सिंग (30 वय) — उत्तराखंड
  • या टोळीने चोरीसाठी आधी दुचाकी चोरी केली आणि नंतर तिचा वापर करून सोनसाखळी हिसकावली. मुख्य आरोपी प्रेशितवर आधीच भायखळा, समतानगर, नेरुळ व सायबर क्राइम यांसारख्या ठिकाणी 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीचा "हिट अँड रन" फॉर्म्युला पोलीसांनी पूर्णपणे उघड केला आहे.

    Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

    ही कारवाई देवेन भारती, पोलीस आयुक्त, Mumbai CP Deven Bharti बृहन्मुंबई, सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त (का व सु), महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या आदेशान्वये व राकेश ओला, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7 यांच्या मार्गदर्शनाखाली, शैलेश पासलवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, घाटकोपर विभाग, मुंबई यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी (गुन्हे), पोलीस निरीक्षक राजेश वंदूगडे (रात्रपाळी पर्यवेक्षक अधिकारी), पोलीस उप निरीक्षक विक्रम ताकमोगे, पोलीस उप निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उप निरीक्षक प्रशांत तायडे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार अनुसे, पोलीस शिपाई रोकडे, पोलीस शिपाई आंब्रे, पोलीस शिपाई सोनवेन, पोलीस शिपाई दळवी, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई राठोड यांनी यशस्वीरीत्या कार्यवाही पार पाडली.

    पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी शहरात येताच काही तासांत गुन्हे करून पुन्हा गायब होत असे. पण या वेळी मुंबई पोलिसांनी त्यांचा हिशोब एकदाचा मांडला आहे.

    शेअर करा