मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये; राज्यभरातील शिवसैनिक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बांधावर

Eknath Shinde Nesco Center : जिथे संकट, तिथे शिवसेना' - यंदाचा मेळावा भव्य न होता फक्त एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी मर्यादित.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये; राज्यभरातील शिवसैनिक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बांधावर

Eknath Shinde Nesco Center : जिथे संकट, तिथे शिवसेना' - यंदाचा मेळावा भव्य न होता फक्त एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी मर्यादित.

मुंबई :- शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट)Eknath Shinde दसरा मेळाव्याच्या स्थळाबाबत आणि स्वरूपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा हा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, हा मेळावा केवळ मुंबई आणि एमएमआर (MMR) क्षेत्रातील शिवसैनिकांसाठीच मर्यादित राहणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. यंदाचा दसरा मेळावा भव्य होणार नसून, राज्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मेळाव्याला हजर राहणार नाहीत. त्याऐवजी, पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण

या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "जिथे आपत्ती, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. एकनाथ शिंदे तिथे धावून जातो. आपल्या लोकांना मदत केली पाहिजे ही त्यामागील भावना आहे." हे खऱ्या अर्थाने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आहे.

पूरपरिस्थिती असलेल्या भागातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत न बोलावता, त्यांनी आपापल्या यंत्रणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरात जाऊन, बांधावर जाऊन मदत करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, या दसरा मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेअर करा