मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

• निवडीचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन; अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ही निवड यथार्थ, पाटील यांची लेखणी प्रेरणादायी'

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

• निवडीचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन; अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ही निवड यथार्थ, पाटील यांची लेखणी प्रेरणादायी'

मुंबई: 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारा जिल्ह्यालाही त्यांनी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू आणि वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन आहे. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर सातारा येथे नियोजित 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची निवड यथार्थ अशीच आहे."

पाटील यांच्या लेखणीचे कौतुक करताना ते म्हणाले, "पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून विविध आणि कसदार साहित्यकृतींची निर्मिती केली आहे. त्यांच्या लेखणीमुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली असून, ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरू लेखकांसाठी प्रेरणादायी ठरेल."

पाटील यांनी ‘पानिपत’ या कादंबरीसह अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

शेअर करा