मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबई पालिकेचा 'महा'बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता 'QR कोड'चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी प्रथमच 'ग्रीन बॉन्डस्'ची एन्ट्री | पुलांच्या बांधणीसाठी 9,650 कोटींचा खजिना खुला

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबई पालिकेचा 'महा'बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता 'QR कोड'चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी प्रथमच 'ग्रीन बॉन्डस्'ची एन्ट्री | पुलांच्या बांधणीसाठी 9,650 कोटींचा खजिना खुला

मुंबई :- देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी आपला विक्रमी 80,952.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या 74,427.41 कोटींच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 8.77 टक्क्यांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात केवळ आकड्यांचा खेळ नसून, मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत.

फेरीवाला धोरणात क्रांती: QR कोड आणि बांगलादेशींवर वचक
मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येताच फेरीवाल्यांबाबत अत्यंत कडक आणि पारदर्शक धोरण जाहीर करण्यात आले आहे.

QR कोड प्रमाणपत्र: आता प्रत्येक अधिकृत फेरीवाल्याला 'QR कोड' आधारित डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पालिका प्रशासनाला एका क्लिकवर अधिकृत फेरीवाल्याची ओळख पटेल.

अनधिकृत फेरीवाल्यांवर सर्जिकल स्ट्राईक: विशेषतः अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात पालिकेने आता युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबईतील पदपथांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पायाभूत सुविधांचा 'मेकओव्हर'

कोस्टल रोड आणि 101 पूल मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

पुलांचे जाळे: मुंबईत एकूण 101 पुलांची कामे हाती घेण्यात आली असून, त्यासाठी 9,650 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 24 कामे पूर्ण झाली असून, येत्या वर्षभरात आणखी 31 पुलांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

कोस्टल रोड व लिन्क रोड: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडच्या 6 व्या टप्प्यासाठी 4,000 कोटी आणि बहुप्रतिक्षित गोरेगाव-मुळुंड लिंक रोडसाठी 2,650 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

'ग्रीन बॉन्डस्'द्वारे निधीची उभारणी

मुंबईतील मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभा करण्यासाठी पालिकेने आता आधुनिक मार्ग निवडला आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पालिका 'ग्रीन बॉन्डस्' वितरित करणार आहे. 1000 कोटींच्या बॉन्डस्साठी केंद्र सरकारकडून 100 कोटींचे विशेष अनुदान मिळणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवरील ताण कमी होणार आहे.

शेअर करा