मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai mono Railway : मुंबईची मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून बंद, प्रवाशांची गैरसोय तांत्रिक अपग्रेडेशनमुळे

Mumbai mono railway Latest News : एमएमआरडीएचा निर्णय; सेवा कधी सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai mono Railway : मुंबईची मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून बंद, प्रवाशांची गैरसोय तांत्रिक अपग्रेडेशनमुळे

Mumbai mono railway Latest News : एमएमआरडीएचा निर्णय; सेवा कधी सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम

मुंबई :- देशातील एकमेव मोनोरेल सेवा गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या तांत्रिक बिघाडांमुळे आणि अपघातांमुळे चर्चेत होती. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 20 सप्टेंबरपासून मुंबईतील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) या मार्गावर धावणारी मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.

तांत्रिक प्रणालीचे अपग्रेडेशन

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनोरेलची तांत्रिक प्रणाली पूर्णपणे अपग्रेड करण्यासाठी आणि भविष्यात ती अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या स्थगिती काळात मोनोरेलच्या सुरक्षिततेसाठी नवीन प्रणाली बसवणे, विविध चाचण्या घेणे आणि संपूर्ण यंत्रणेचे आधुनिकीकरण करणे यावर भर दिला जाईल. यामुळे भविष्यात प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळता येतील आणि सेवा अधिक सुरक्षित होईल.

प्रवाशांची गैरसोय

मोनोरेल सेवा बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. विशेषतः चेंबूर, वडाळा, नायगाव, लालबाग, आणि सात रस्ता परिसरातील हजारो प्रवाशांना आता पर्यायी सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे.

दरम्यान, मोनोरेल सेवा नेमकी किती दिवसांसाठी बंद राहणार आहे, याबद्दल एमएमआरडीएने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही सेवा लवकर पूर्ववत सुरू व्हावी अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणीही होत आहे.

मोनोरेल प्रवासाचे टप्पे:

फेज १: वडाळा ते चेंबूर

फेज २: संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते वडाळा

शेअर करा