मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Mono Railway: मुंबईकरांची गैरसोय! तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल दोन तास ठप्प

Mumbai Mono Railway Latest News : वडाळा ते जेकब सर्कल सेवा विस्कळीत; 17 प्रवाशांना दुसऱ्या मोनोमधून सुखरूप बाहेर काढले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Mono Railway: मुंबईकरांची गैरसोय! तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल दोन तास ठप्प

Mumbai Mono Railway Latest News : वडाळा ते जेकब सर्कल सेवा विस्कळीत; 17 प्रवाशांना दुसऱ्या मोनोमधून सुखरूप बाहेर काढले

मुंबई :- मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मार्गावरील मोनोरेल सेवा आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे दोन तास ठप्प झाली होती. यामुळे वडाळा ते जेकब सर्कल मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळी 7.40 च्या सुमारास बिघाड झाल्याने एका मोनोरेल गाडीतील 17 प्रवाशांना दुसऱ्या मोनोमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र बिघाडामुळे ही सेवा बराच वेळ विस्कळीत राहिली.

नेमके काय घडले?

सोमवारी सकाळी वडाळा ते जेकब सर्कल मार्गावरून धावणाऱ्या मोनोरेलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ती एकाच जागी थांबली. घटनेची माहिती मिळताच महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे (एमएमएमओसीएल) अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन दलाची वाट न पाहता, अधिकाऱ्यांनी तातडीने दुसऱ्या रुळावर दुसरी मोनोरेल आणली. त्यांनी बंद पडलेल्या गाडीतील 17 प्रवाशांना दुसऱ्या गाडीत सुरक्षितपणे हलवले आणि पुढील स्थानकावर सोडले. सकाळी 7.30 वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

प्रवाशांची नाराजी

दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बिघाड दुरुस्त करून मोनोरेल सेवा पूर्ववत करण्यात आली. सध्या मोनोरेल सेवा सुरळीत सुरू असून, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एमएमएमओसीएलने दिलगिरी व्यक्त केली आहे.

विशेषतः पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते तेव्हा अनेक प्रवासी मोनोरेलचा पर्याय निवडतात. अशा वेळी सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी निवडलेली मोनोरेलच बंद पडल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेअर करा