मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Fraud News : धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा! 'पैगंबरांच्या वंशाचा' धाक दाखवून मुंबईत 11 लाखांची फसवणूक!

Mumbai Latest Fraud News : दागिने दुप्पट करण्याचे आमिष, घरात गुप्तपणे ठेवलेली 'पवित्र' डबी; माहिम पोलिसांकडून फरार आरोपी कादरीचा शोध सुरू!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Fraud News : धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा! 'पैगंबरांच्या वंशाचा' धाक दाखवून मुंबईत 11 लाखांची फसवणूक!

Mumbai Latest Fraud News : दागिने दुप्पट करण्याचे आमिष, घरात गुप्तपणे ठेवलेली 'पवित्र' डबी; माहिम पोलिसांकडून फरार आरोपी कादरीचा शोध सुरू!

मुंबई (माहिम) :- मुंबईतील माहिम परिसरात पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाचा धाक दाखवून एका कुटुंबाची तब्बल 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने कुटुंबातील महिलांचा धार्मिक श्रद्धांवर विश्वास संपादन करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात Mahim Police Station गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. Mahim Latest Fraud News

नेमका काय घडला प्रकार?

माहिम येथे राहणारे अन्सार अहमद अब्दुल गनी यांनी या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीची सुरुवात 2022 मध्ये झाली. अन्सार आणि त्यांचा भाऊ इसरार फारुकी यांची दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यावर कादरी नावाच्या व्यक्तीशी भेट झाली.

यावेळी कादरीने आपण पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असून, आपल्याकडे त्यांचे पवित्र केस असल्याची बतावणी केली. यावर विश्वास ठेवून दोन्ही भावांनी त्याला माहिम येथील घरी बोलावले.

'पवित्र डबी' आणि फसवणुकीचा डाव

कादरी घरी आला तेव्हा तो एका काचेच्या डब्ब्यात एक केस घेऊन आला होता. तो पैगंबरांचा असल्याचे सांगून त्याने त्या डब्ब्यासोबत काही विधी केले आणि ती डबी घरातील कपाटात गुप्तपणे ठेवण्यास सांगितली. 'जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत ही डबी उघडायची नाही,' अशी सक्त ताकीद त्याने दिली.

काही दिवसांनी दोन्ही भाऊ बाहेर असताना कादरी पुन्हा घरी आला. त्याने दोन्ही भावांच्या पत्नींना भेटून सांगितले की, जर त्यांनी आपले सर्व दागिने त्या पवित्र डबीजवळ ठेवले, तर ते दागिने दुप्पट होतील आणि घरात प्रचंड पैसा वाढेल.

धार्मिक श्रद्धा आणि अधिक संपत्तीच्या आमिषाने दोन्ही महिलांनी सुमारे 11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्या डबीजवळ ठेवले. त्यानंतर काही विधी करायचे आहेत, असे सांगून कादरीने महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. महिला बाहेर जाताच कादरीने कपाटातील दागिने घेऊन पळ काढला.

फसवणूक उघड, विशेष पथक कामाला

काही दिवसांनी महिलांनी ही घटना पतींना सांगितली, तेव्हा आपली गंभीर फसवणूक झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने माहिम पोलीस स्टेशन गाठून कादरीविरोधात फसवणूक आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

माहिम पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक तयार केले असून, आरोपी कादरीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

शेअर करा