मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : "पोलीस वर्दीच्या आड व्यवहार!" खेरवाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांवर निलंबनाचा धडाका

• कर्तव्यावर नसतानाही 'खाजगी भानगडी'!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : "पोलीस वर्दीच्या आड व्यवहार!" खेरवाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांवर निलंबनाचा धडाका

•कर्तव्यावर नसतानाही 'खाजगी भानगडी'! आर्थिक वादात पोलिसांचा हस्तक्षेप उघड

मुंबई :- खाकी वर्दीतील जबाबदारी सोडून खाजगी वादात मध्यस्थी केल्याचा गंभीर प्रकार वांद्रेच्या खेरवाडी पोलीस ठाण्यात उघड झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपायांनी ड्युटीवर नसतानाही दोन व्यक्तींमधील आर्थिक वाद 'स्वतःहून' हाताळल्याचे समोर आले असून, पोलिसांच्या अशा गैरवर्तनामुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. या तिघांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित अधिकारी आणि शिपाई हे सर्व खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी दिवसपाळीमध्ये कर्तव्यावर नसताना, तक्रारदार मुफ्ती नसीमुद्दीन सुखानु शेख आणि मेहूल मेहता ऊर्फ शफी सूर्या यांच्यातील आर्थिक वादात मध्यस्थी केली होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली.

या कारवाईचे आदेश अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी नुकतेच जारी केले आहेत. प्राथमिक चौकशीनंतर सादर झालेल्या अहवालावरून संबंधित तिघांच्या कारभारावर शंका घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळताच तत्काळ तिघांनाही निलंबित करण्यात आले.

सध्या या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलीस पदाचा दुरुपयोग केला का? त्यांनी कायदेशीर प्रक्रिया डावलली का? याचा तपशीलवार आढावा घेतला जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा: Panvel News : समर्थ लोकतंत्र हिंदी साप्ताहिकाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते प्रकाशन

शेअर करा