मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : लिफ्ट घेतली… पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

Mumbai Latest Crime News : घाटकोपरमधील महिलेला ढकलून सोनसाखळी हिसकावणारा तरुण पुण्यातून अटकेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bangladeshi women arrested

Mumbai Latest Crime News : घाटकोपरमधील महिलेला ढकलून सोनसाखळी हिसकावणारा तरुण पुण्यातून अटकेत

मुंबई :- "क्षणभराची लिफ्ट, आयुष्यभराची शिक्षा!" असं म्हणणं या तरुणावर अगदी तंतोतंत लागू होतं. घाटकोपरमध्ये महिलेला ढकलून सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी 350 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपशीलवार मागोवा घेत नाट्यमयरित्या पर्दाफाश केला. चोरीपूर्वी दिलेली एक साधी लिफ्टच शेवटी त्याच्या अटकेचं कारण ठरली!

20 मे रोजी सायंकाळी भटवाडीत पायी चाललेल्या रंजना घुटूकडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी एक अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावली. आरोपीने त्यांना ढकलून दिल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गुन्हा गंभीर असल्याने पोलीस दल सज्ज झाले.

परंतु ज्याठिकाणी चोरी झाली, तेथे कोणतेही सीसीटीव्ही नव्हते! त्यामुळे हा "गूढ चोर" सापडणं अवघड वाटत होतं. मात्र पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी परिसरातील 350 हून अधिक कॅमेरे तपासले आणि एका चित्रफितीत एक महत्त्वाचा दृष्य सापडला — एक तरुण दुचाकीवर एका तरुणीसोबत जाताना दिसला.

हीच तरुणी नंतर पंतनगरजवळ उतरली होती. पोलिसांनी तिचा मागोवा घेत रिक्षा क्रमांक मिळवला, आणि ती आकाश लोखंडे नावाच्या तरुणाची शाळेतील मैत्रीण असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या माहितीनुसार, आकाश तिला सहजच घरजवळ सोडण्यास निघाला होता… पण तेवढ्यात त्याने चोरी केली आणि पुण्याला पसार झाला.

पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून आकाशला तळेगाव, पुणे येथून अटक केली.चौकशीत उघड झाले की तो मुलींवर खर्च करत होता, त्यासाठी त्याने दीड लाखांची दुचाकी घेतली होती आणि कर्जबाजारी झाल्यावर त्याने चोरीचा मार्ग निवडला.

या सर्जनशील तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक कैलास तिरमारे, उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे आणि अन्य पथकांनी मोलाची भूमिका बजावली.

शेअर करा