मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : मुंबईत खळबळजनक घटना! नेव्हीच्या संवेदनशील भागातून इन्सास रायफलची चोरी; आरोपी तेलंगणामधून जेरबंद

Mumbai Latest Crime News : चोरीला गेलेली रायफल आणि 40 जिवंत राऊंड जप्त; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Crime News

Mumbai Latest Crime News : चोरीला गेलेली रायफल आणि 40 जिवंत राऊंड जप्त; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

मुंबई :- मुंबईत एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक घटना घडली आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी, नेव्हीच्या संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रातून एका अज्ञात व्यक्तीने इन्सास रायफल आणि 40 जिवंत राऊंडची चोरी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू करत अवघ्या काही दिवसांतच आरोपींना तेलंगणा राज्यातून अटक केली आहे.

नेमके काय घडले?

6 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.50 च्या सुमारास, गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी नेव्ही नगर, कफ परेड येथे एक जवान कर्तव्यावर होता. यावेळी एका अनोळखी इसमाने त्याच्या जवळ येऊन आपण 'QRT डिपार्टमेंट'मधून आलो आहोत असे सांगितले. त्याने मोठ्या शिताफीने जवानाकडील इन्सास रायफल, दोन मॅगझीन आणि 40 जिवंत राऊंड स्वतःकडे घेतले आणि जवानाला 'तुझी ड्युटी संपली आहे' असे सांगून हॉस्टेलला पाठवले.

गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा घेत फसवणूक, पोलिसांकडून तात्काळ तपास सुरू

जवान हॉस्टेलला जात असताना त्याला आपली चूक लक्षात आली आणि तो परत घटनास्थळी आला. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. यानंतर जवानाने तात्काळ घटनेची तक्रार केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेने लावला शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा तात्काळ गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय तपास सुरू केला. या तपासणीदरम्यान, आरोपी तेलंगणातील आसिफाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस पथक तात्काळ आसिफाबादला रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरीला गेलेली इन्सास रायफल आणि 40 जिवंत राऊंड यशस्वीपणे हस्तगत केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहाणाय' हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या मुंबई पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

शेअर करा