मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : 'बनावट ग्राहक' बनून पोलिसांचा सापळा; विक्रोळीत बोगस नोटांच्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Latest Fraud News : 25 हजारात 1 लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष; चार आरोपी गजाआड

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Cyber Crime News

Mumbai Latest Fraud News : 25 हजारात 1 लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष; चार आरोपी गजाआड

मुंबई :- भारतीय चलनाच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा गुन्हे शाखा कक्ष-6 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री विक्रोळी परिसरात सापळा रचून पोलिसांनी या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा, एक मोटारगाडी आणि सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. Mumbai Latest Crime News

गुन्हे शाखा कक्ष-6 च्या Mumbai Crime Branch Unit 6 अधिकाऱ्यांना मुंबईत बनावट नोटांची विक्री करणाऱ्या एका टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी 'बनावट ग्राहक' बनून त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपी 25 हजार रुपयांच्या बदल्यात 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा देत असल्याचे या चौकशीत समोर आले. पोलिसांनी या टोळीला नोटांच्या व्यवहारासाठी विक्रोळीतील फिरोजशहा नगर येथे बोलावले.

सोमवारी रात्री 11 च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून नफिस खान, मंजर सोंडे, सईद सिद्धीकी आणि मोसीन चौधरी या चार आरोपींना ताब्यात घेतले. हे आरोपी जास्त नफ्याचे आमिष दाखवून लोकांना फसवणूक करत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक कार आणि सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत.

शेअर करा