मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News ; "स्वस्त डॉलरचं गंडा तंत्र! काळ्या नोटांचं 'ब्लॅक मॅजिक', आणि चार फसवे गजाआड!"

Mumbai Latest Crime News : लॉजमध्ये बनावट डॉलरची जादू; 42 बंडल, केमिकल आणि रोखसह टोळी अटकेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai fake dollar scam,Chemical dollar scam Mumbai,Crime Branch Unit 6 arrests,Fake currency racket India,Black dollar paper fraud,Currency exchange fraud Mumbai,Shivkrupa Lodge Mankhurd scam,Fake US dollar exchange scam,Mumbai crime news,Currency scam arrest Mumbai

Mumbai Latest Crime News : लॉजमध्ये बनावट डॉलरची जादू; 42 बंडल, केमिकल आणि रोखसह टोळी अटकेत

मुंबई | "अमेरिकन डॉलर हवे का? तेही बाजारभावाच्या निम्म्या किमतीत!" — अशा आमिषाने अनेकांना जाळ्यात ओढणाऱ्या सराईत फसवेखोर टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या कक्ष-6 Mumbai Crime Branch Unit 6 पथकाने केला आहे. स्वस्त डॉलर देतो म्हणत विश्वास संपादन करून, काळ्या कागदांचं 'चलन' थोपवणाऱ्या या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रईस अहमद सय्यद, अबिदूर रेहमान शहा, अफजलअली सय्यद आणि आदिल साहिल खान. हे सर्व आरोपी मानखुर्द येथील टी-जंक्शनमधील लॉजमध्ये आपली 'काळ्या डॉलर्सची प्रयोगशाळा' चालवत होते.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकताच, चौघांना ताब्यात घेण्यात आले आणि 42 बनावट डॉलरच्या बंडल, केमिकलचे डबे, 6 मोबाइल फोन आणि 30,600 रुपये रोख रक्कम असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फसवणुकीसाठी ही टोळी खऱ्या डॉलरच्या काही नोटांवर काळा रंग फासून त्यांना बनावट वाटावं असं भासवायची. ग्राहकाच्या समोर त्या नोटा एका 'विशेष रसायनात' बुडवून परत खऱ्यासारखं रूप दाखवायची. आणि मग संपूर्ण बंडलमध्ये असेच 'डॉलर' असल्याचं सांगून, प्रत्यक्षात काळ्या कागदांचं बंडल देत आरोपी पसार व्हायचे.

शेअर करा