मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai CBI Raid : मुंबईत 'सीबीआय'चा मोठा दणका; 5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षक रंगेहात अटक!

Mumbai CBI Raid News : ऑडिटच्या नावाखाली मागितली होती 17 लाखांची लाच; घराच्या झडतीत लाखो रुपयांची रोकड जप्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai CBI Raid : मुंबईत 'सीबीआय'चा मोठा दणका; 5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षक रंगेहात अटक!

Mumbai CBI Raid News : ऑडिटच्या नावाखाली मागितली होती 17 लाखांची लाच; घराच्या झडतीत लाखो रुपयांची रोकड जप्त

मुंबई | केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) मुंबईतील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) कार्यालयातील एका वरिष्ठ अधीक्षकाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 5 लाख रुपये स्वीकारताना या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर झालेल्या घराच्या झडतीत सीबीआयला 18 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. Mumbai Latest Raid News

98 लाखांच्या कर चोरीची दिली होती धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट 26 नोव्हेंबर रोजी संबंधित जीएसटी अधीक्षकाने केले होते. "तुमच्या कंपनीने 98 लाख रुपयांचा कर बुडवला आहे," अशी धमकी देऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी या अधिकाऱ्याने सुरुवातीला 20 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर ही रक्कम 17 लाख रुपये ठरवण्यात आली. तक्रारदाराने या भ्रष्टाचाराची माहिती सीबीआयकडे दिली आणि 22 डिसेंबर रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली.

सापळा आणि अटक

ठरल्याप्रमाणे तक्रारदार 5 लाख रुपये घेऊन अधिकाऱ्याकडे गेला असता, सीबीआयच्या पथकाने दबा धरून या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना पकडले. सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी सरकारी कर्मचाऱ्याच्या मुंबईतील घराची आणि कार्यालयाची कसून झडती घेतली.

घरात सापडले 'घबाड' आणि मालमत्तेचे पुरावे

सीबीआयने टाकलेल्या छाप्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बेहिशेबी रोकड: आरोपीच्या घरातून 18 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली, ज्याचा हिशेब आरोपीला देता आला नाही.

स्थावर मालमत्ता: एप्रिल 2025 मध्ये 40 लाख 30 हजार रुपयांची आणि जून 2024 मध्ये 32.10 लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याची कागदपत्रे सापडली आहेत.

डिजिटल पुरावे: कार्यालयातील झडतीमध्ये संबंधित कंपनीच्या ऑडिट अहवालाशी संबंधित डिजिटल पुरावे आणि संशयास्पद कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
या कारवाईमुळे मुंबईतील जीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. हा अधिकारी आणखी किती कंपन्यांना अशा प्रकारे लुबाडत होता, याचा सखोल तपास सीबीआय करत आहे.

शेअर करा