मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Car Robbery : महागड्या गाड्या चोरणाऱ्या 'बंबय्या'ला बेड्या

Mumbai Police Arrested Car Robbers : सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडले; 70 हून अधिक गुन्हे उघड

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Car Robbery : महागड्या गाड्या चोरणाऱ्या 'बंबय्या'ला बेड्या

Mumbai Police Arrested Car Robbers : सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडले; 70 हून अधिक गुन्हे उघड

मुंबई :- मुंबई, पुणे आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये महागड्या गाड्या व त्यातील मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जुनेद युनुस शेख उर्फ 'बंबय्या' असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे 70 हून अधिक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. Mumbai Latest Crime News

मागील काही दिवसांपूर्वी वडाळा परिसरातून संजय ठोंबरे यांची होंडा सिटी कार चोरीला गेली होती. याप्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-4, रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. मुंबईतील विविध भागांतील 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. सहायक पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग,योगेश गावडे यांच्या देखरेखीखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सांताक्रूझ परिसरात सापळा रचून जुनेद शेखला ताब्यात घेतले.

पोलिसांनी जुनेदची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे पिंपरी-चिंचवड येथे चोरीला गेलेले तीन मोबाईल सापडले. चौकशीत जुनेदने मुंबईतून चोरी केलेली कार पिंपरी-चिंचवड येथे इतर गुन्हे करण्यासाठी वापरल्याचे कबूल केले. पोलिसांनी चोरीला गेलेली कार जप्त करून 100% मालमत्ता हस्तगत केली आहे.

जुनेद युनुस शेख उर्फ 'बंबय्या' याच्यावर गुजरात, पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, नवी मुंबई यांसारख्या शहरांमध्ये 70 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते आणि तपास पथकातील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

शेअर करा