मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Bribe News : मुंबईत 'लाच'खोरीचा पर्दाफाश! आजारी कामगाराकडून 8 हजारांची लाच घेताना बीएमसी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Mumbai Latest Bribe News : घरी बसून नोकरी देण्यासाठी मागितली लाच; कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश सुरकुळे यांना अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Bribe News : मुंबईत 'लाच'खोरीचा पर्दाफाश! आजारी कामगाराकडून 8 हजारांची लाच घेताना बीएमसी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Mumbai Latest Bribe News : घरी बसून नोकरी देण्यासाठी मागितली लाच; कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश सुरकुळे यांना अटक

मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश मारुती सुरकुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, आजारी असलेल्या एका सफाई कामगाराकडून 'घरी बसून नोकरी' आणि 'ठराविक रोड' देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. Mumbai Latest Crime News

काय आहे प्रकरण?

कुर्ला येथील एल वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कामगाराला गेल्या काही काळापासून पाठदुखीचा त्रास होत आहे. नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कामगार कामावर नियमित जाऊ शकत नव्हता. याच संधीचा फायदा घेत कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश सुरकुळे यांनी त्याला मदतीच्या नावाखाली लाचेची मागणी केली. Mumbai BMC Latest Bribe News

‘घरी बसून नोकरी’ची ऑफर

16 सप्टेंबर रोजी पीडित सफाई कामगाराने सुरेश सुरकुळे यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली आणि दुसऱ्या एका कामगाराची मदत मिळावी अशी विनंती केली. तेव्हा सुरकुळे यांनी त्याला धक्कादायक ऑफर दिली. त्यांनी सांगितले की, “दर महिन्याला 7,000 रुपये दे आणि घरी बसून नोकरी कर, किंवा एकदाच 15,000 रुपये देऊन फिक्स रोड घे.” या मागणीमुळे संतप्त झालेल्या कामगाराने 19 सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. Mumbai ACB Trap News

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीने सापळा रचून 20 सप्टेंबरच्या संध्याकाळी सुरेश सुरकुळे यांना 8 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. स्वतःच्या आजारी कर्मचाऱ्याकडूनच लाच घेण्याचा हा प्रकार उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सुरकुळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शेअर करा