मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Bribe News : हॉटेल सुरू ठेवण्यासाठी लाच, मुंबई महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Mumbai BMC Officer Latest Bribe News : 30 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले; आरोग्य परवान्यासाठी केली होती 40 हजारांची मागणी

V
Vivek

2 मिनिट वाचन

Beed Bribe News

Mumbai BMC Officer Latest Bribe News : 30 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले; आरोग्य परवान्यासाठी केली होती 40 हजारांची मागणी

मुंबई: हॉटेल सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली मुंबई महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. Mumbai ACB Trap गणेश संभाजी कदम (वय 57) असे अटक करण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षकाचे नाव असून, त्याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मित्राचे हॉटेल असून, तक्रारदार मागील एक वर्षापासून ते चालवत होते. 24 जून 2025 रोजी मुंबई महापालिकेच्या आर-दक्षिण विभागातील आरोग्य विभागाचे अधिकारी रेस्टॉरंटमध्ये तपासणीसाठी आले. त्यांनी तक्रारदाराकडे आरोग्य परवाना आणि ईटिंग हाऊस परवान्याची मागणी केली. हे परवाने नसल्यामुळे, संबंधित अधिकाऱ्याने रेस्टॉरंटमधील साहित्य जप्त करून हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले. Mumbai BMC Officer Latest Bribe News

जप्त केलेले साहित्य सोडवण्यासाठी आणि हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार 28 जून रोजी आर-दक्षिण पालिका कार्यालयात गेले. तिथे त्यांना स्वच्छता निरीक्षक गणेश कदम भेटले. कदमने हॉटेल पुढील तीन महिने सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मॅडम रेस्टॉरंट चालवू देणार नाही, अशी धमकीही त्याने दिली.

गणेश कदमला लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने, त्यांनी 1 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी येथील कार्यालयात लेखी तक्रार केली. वरिष्ठांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. 9 जुलै रोजी एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीत कदमने हॉटेल सुरू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार, बुधवारी (23 जुलै) एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, 30 हजार रुपये स्वीकारताना गणेश कदमला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी कदम विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. कदमला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची एसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याबाबत एसीबी अधिक तपास करत आहे.

शेअर करा