मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Breaking News : मुंबईत दिवसाढवळ्या स्टुडिओमध्ये 20 मुले 'ओलीस'; युट्यूबर 'रोहित आर्या' ताब्यात, मनोरुग्ण असल्याचा संशय

YouTuber Rohit’s Arya Latest News : आर ए स्टुडिओमध्ये तीन तास मुलांना डांबून ठेवले; जेवणासाठी बाहेर न सोडल्याने प्रकार उघडकीस

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Breaking News : मुंबईत दिवसाढवळ्या स्टुडिओमध्ये 20 मुले 'ओलीस'; युट्यूबर 'रोहित आर्या' ताब्यात, मनोरुग्ण असल्याचा संशय

YouTuber Rohit’s Arya Latest News : आर ए स्टुडिओमध्ये तीन तास मुलांना डांबून ठेवले; जेवणासाठी बाहेर न सोडल्याने प्रकार उघडकीस

मुंबई :- मुंबईतील एका गजबजलेल्या परिसरात 'आर ए स्टुडिओ'च्या Mumbai RA Studio पहिल्या मजल्यावर अभिनय वर्गासाठी आलेल्या सुमारे 20 लहान मुलांना दिवसाढवळ्या ओलीस (डांबून) ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले. Mumbai Latest Crime News

गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टुडिओमध्ये ऑडिशन सुरू होते. आज सकाळी ऑडिशनसाठी सुमारे 100 मुले आली होती. आरोपी रोहित आर्या याने 80 मुलांना घरी पाठवले, परंतु उर्वरित अंदाजे 15 ते 20 मुलांना स्टुडिओमधील एका खोलीत बंद करून डांबून ठेवले.

हा प्रकार दुपारी 1 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल तीन तास सुरू होता. मुले खिडकीतून बाहेर डोकावत असल्याचे आणि त्यांना जेवणासाठी बाहेर न सोडल्याचे पाहून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलांना डांबून ठेवल्याची माहिती मिळताच स्टुडिओबाहेर एकच गोंधळ उडाला आणि पालकांनी धाव घेतली.

15 ते 20 मुलांना स्टुडिओमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही बाजूंनी स्टुडिओला वेढा टाकला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत या सर्व मुलांची सुटका केली आहे, ज्यामुळे पालकांच्या जीवात जीव आला आहे.

पोलिसांनी आरोपी रोहित आर्या याला ताब्यात घेतले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. आरोपीच्या नेमक्या मागण्या काय होत्या आणि त्याने मुलांना ओलीस का ठेवले, हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, आरोपी रोहित आर्या हा मनोरुग्ण (Mental Illness) असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या घटनेमागील नेमके कारण शोधत आहेत.

शेअर करा