मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबईत बॉम्बस्फोटांची धमकी; महापालिका मुख्यालय, अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि दिलजीत दोसांझचा शो निशाण्यावर

Mumbai News : मुंबई: मुंबईत एकापाठोपाठ एक येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांमुळे शुक्रवारी (दि.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

मुंबईत बॉम्बस्फोटांची धमकी; महापालिका मुख्यालय, अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि दिलजीत दोसांझचा शो निशाण्यावर
मुंबईत बॉम्बस्फोटांची धमकी; महापालिका मुख्यालय, अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि दिलजीत दोसांझचा शो निशाण्यावर

Mumbai News : मुंबई: मुंबईत एकापाठोपाठ एक येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांमुळे शुक्रवारी (दि. २३) संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली. मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. एका कथित अतिरेकी संघटनेने मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या धमकीमध्ये मुंबईतील अनेक नामांकित व्यक्ती, शाळा आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याची चेतावणी दिली आहे.https://maharashtramirror.com/Mumbai News

धमकीच्या या ईमेलमध्ये स्वतःला 'खलिस्तान नॅशनल आर्मी' चा सदस्य असल्याचे सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तीने पुढील एका महिन्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा इशारा दिला आहे. या ईमेलमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला असून, हल्ल्याचे नियोजित वेळापत्रकही देण्यात आले आहे.

धमकीच्या ईमेलमधील मुख्य लक्ष्य आणि तारीख
ईमेलमध्ये सर्वात आधी मुंबई पालिका मुख्यालय आणि महापौरांच्या कार्यालयाला तात्काळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रसिद्ध 'जलसा' या बंगल्यावर ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

आगामी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका शाळेवर ग्रेनेड हल्ला केला जाईल, तसेच इतर ३ ते ४ शाळांनाही टार्गेट केले जाईल, असा उल्लेख ईमेलमध्ये आहे.

२७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या संगीत कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाची कारवाई
धमकीचा ईमेल मिळताच मुंबई पोलीस, सायबर सेल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने चक्रे फिरवली. पालिका मुख्यालय, महापौरांचा बंगला आणि संबंधित परिसराची श्वान पथकासह कसून तपासणी करण्यात आली. सुदैवाने, प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा साहित्य आढळलेले नाही.

सुरक्षेचा उपाय म्हणून अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर, स्थानिक शाळांच्या परिसरात आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे. सायबर पोलीस या धमकीच्या ईमेलचा आयपी ॲड्रेस आणि डिजिटल फूटप्रिंटचा माग काढत असून, हा केवळ एक अफवा पसरवणारा 'होक्स कॉल' (खोटी धमकी) आहे का, याचाही तपास केला जात आहे.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा