मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai BMC Election : ठाकरे-पवार गटाला मुंबईत खिंडार! कलिनाचे विद्यमान नगरसेवक दिनेश कुबल यांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai Thane BMC Election Latest News : विनायक राऊतांचे निकटवर्तीय राजू नाईकही मैदानात; ठाण्यात उमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'धनुष्यबाण' हाती

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai BMC Election : ठाकरे-पवार गटाला मुंबईत खिंडार! कलिनाचे विद्यमान नगरसेवक दिनेश कुबल यांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai Thane BMC Election Latest News : विनायक राऊतांचे निकटवर्तीय राजू नाईकही मैदानात; ठाण्यात उमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'धनुष्यबाण' हाती

मुंबई/ठाणे | आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची लगबग सुरू असतानाच, मुंबईत शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कलिना येथील वॉर्ड क्रमांक 89 चे विद्यमान नगरसेवक दिनेश कुबल आणि खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय राजू नाईक यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादीलाही धक्का; कार्यकर्त्यांची मोठी गळती

केवळ ठाकरे गटच नव्हे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रवींद्र घुसळकर, राजू शेट्टी, विशाल कनावजे यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत 'धनुष्यबाण' हातात घेतला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये प्रभाव असलेले हे नेते सत्ताधारी गटात गेल्याने विरोधकांच्या चिंतेत भर पडली आहे.
ठाकरे-मनसे युती आणि जागावाटपाचा तिढा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आगामी निवडणुकीसाठी युती झाली असली, तरी जागावाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

दादर-माहीमचा पेच: दादर-माहीम हा विभाग शिवसेना भवन आणि राज ठाकरेंचे निवासस्थान 'शिवतीर्थ' यामुळे प्रतिष्ठेचा मानला जातो. येथे ठाकरे गटाला 4 जागा मिळाल्या असून मनसेला 2 जागा (वॉर्ड 190 आणि 192) देण्यात आल्या आहेत.
बंडखोरीची भीती: मनसेसाठी सोडलेल्या जागांवर ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी दावा सांगितला आहे. ज्या वॉर्डांमध्ये ठाकरे गटाची ताकद जास्त आहे, तिथे मनसेला जागा सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा 'मास्टरस्ट्रोक'

एककीडे दोन्ही ठाकरे बंधू मराठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी एकत्र आले असताना, एकनाथ शिंदे यांनी थेट विद्यमान नगरसेवक आणि विनायक राऊतांच्या निकटवर्तीयांना फोडून मुंबईत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दिनेश कुबल यांच्या रूपाने कलिनासारख्या महत्त्वाच्या भागात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे.

शेअर करा