मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत उद्या! मनसेची सव्वाशे जागांवर दावा करण्याची तयारी

Thackeray MNS Yuti : ठाकरे गटासोबत युतीआधी 'मेरीट'नुसार जागावाटपाची रणनिती; दादर, परळ, भांडुपसारख्या मराठी पट्ट्यात मनसेची ताकद

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut,Shiv Sena,Uddhav Thackeray,Maharashtra Navnirman Sena,MNS,Raj Thackeray,Amit Thackeray,Aaditya Thackeray,Aditya Thackrey,संजय राऊत,शिवसेना,उद्धव ठाकरे,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,मनसे,राज ठाकरे,अमित ठाकरे,आदित्य ठाकरे

Thackeray MNS Yuti : ठाकरे गटासोबत युतीआधी 'मेरीट'नुसार जागावाटपाची रणनिती; दादर, परळ, भांडुपसारख्या मराठी पट्ट्यात मनसेची ताकद

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) तयारी करणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी प्रभाग आरक्षण सोडत उद्या, 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार चाचपणी सुरू केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) देखील आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

मनसेचा 'सव्वाशे' जागांचा दावा

शिवसेना (ठाकरे गट) सोबत संभाव्य युती होण्याआधीच मनसेने मुंबई महापालिकेच्या सर्व 227 जागांचा सविस्तर आढावा घेतला आहे. मनसेच्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आढावा बैठकांमध्ये मुंबईतील सव्वाशे (125) जागांवर पक्षाची ताकद असल्याचा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास चांगले उमेदवार तयार असल्याचा अंदाज समोर आला आहे. मनसेने तयार केलेल्या यादीत माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी यांसारख्या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे.

जागावाटपाचे सूत्र

जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. युती झाल्यास हे जागावाटप कुठल्याही निश्चित सूत्रावर नव्हे, तर 'मेरीट'नुसार म्हणजेच ज्या पक्षाची ज्या जागेवर अधिक ताकद आहे, त्यानुसार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठीचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहीर होईल. यानंतर, 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यात येतील. हरकती व सूचनांवर विचार करून 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयुक्तांकडून निर्णय घेतला जाईल आणि 28 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल.

शेअर करा