मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर 33 कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोन दिवसांत 8 तस्कर अटकेत

Mumbai Latest Crime News : बँकॉक व मलेशियातून आली होती अमली चढ; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

Mumbai Latest Crime News : बँकॉक व मलेशियातून आली होती अमली चढ; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई | मुंबई विमानतळावर Mumbai Airport Drug Trafficking सीमाशुल्क विभागाने दोन दिवसांत केलेल्या धडाकेबाज कारवायांमध्ये तब्बल 33 किलो 'हायड्रो गांजा' जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 33 कोटी रुपये असून, याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत आलेल्यांमध्ये सात प्रवासी आणि विमानतळाबाहेर अमली पदार्थ घेण्यासाठी आलेला एक जण यांचा समावेश आहे.

ही तस्करी बँकॉक (थायलंड) आणि मलेशिया येथून करण्यात आली होती. तस्करांनी ट्रॉली बॅगमध्ये अत्यंत कुशलतेने गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमाशुल्क विभागाने विशेष तपासणी उपकरणांचा वापर करत सर्व अंमली पदार्थ शोधून काढले. या मोहिमेत मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत वेगवेगळ्या सहा प्रकरणांमध्ये कारवाई झाली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत हायड्रोपोनिक गांजा अर्थात हायड्रो गांजाची मागणी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली असून, तस्करांनी भारतात त्याची तस्करी सुरू केली आहे. मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थानिक पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथक यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली आहे.

विधानसभेच्या चालू पावसाळी अधिवेशनात हायड्रो गांजाच्या वाढत्या साखळीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात स्पष्ट केलं की, अशा तस्करांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.

शेअर करा