मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Ahmedabad Express News : मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; नायगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला आरोपींचा पाठलाग

Mumbai Ahmedabad Express Robbery Case : 'गुगल पे'चा पासवर्ड घेऊन पसार होणाऱ्या लुटारूंना 24 तासांत बेड्या; कारसह 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Ahmedabad Express News : मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; नायगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला आरोपींचा पाठलाग

Mumbai Ahmedabad Express Robbery Case : 'गुगल पे'चा पासवर्ड घेऊन पसार होणाऱ्या लुटारूंना 24 तासांत बेड्या; कारसह 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

वसई/नायगाव | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना गाठून, मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नायगाव पोलिसांनी Naygaon Police News पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुटलेले मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. Mumbai Latest Crime News

नेमकी घटना काय?

21 डिसेंबर 2825 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी हे ससूनवघर येथील ब्रिजजवळून पायी जात होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या 'मारुती सुझुकी एसप्रेसो' कारमधून आलेल्या तिघांनी त्यांना गाडीत खेचले. "पैसे आणि मोबाईल काढ, नाहीतर जिवंत मारून टाकू," अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही, तर आरोपींनी फिर्यादीला घाबरवून त्यांच्या मोबाईलमधील 'गुगल पे'चा (Google Pay) पासवर्डही जबरदस्तीने घेतला आणि त्यांना रस्त्यात सोडून पळ काढला.

नायगाव पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाची दोन विशेष पथके तयार केली. फिर्यादीने दिलेल्या अपूर्ण गाडी क्रमांकाच्या (MH-….-9363) आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांचे जाळे पसरवले. अखेर नायगाव पूर्व येथील सोमेश्वर नगर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल

1) वसीउल्ला सलीम खान (वय 22, रा. सोमेश्वर नगर, नायगाव)

2) रणजीत संदीप जैस्वाल (वय 19 , रा. नायगाव पूर्व) तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस कारवाईत जप्त करण्यात आलेली मालमत्ता

31 हजार 700 रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम.

5 लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एसप्रेसो कार.

या पथकाने बजावली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आणि इतर अंमलदारांचा समावेश होता.

शेअर करा