मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवार आक्रमक; तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Pune News : पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटीच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवार आक्रमक; तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवार आक्रमक; तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Pune News : पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटीच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्येही मोठी नाराजी असून, पुण्यात विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती लावली.https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत रोहित पवार यांनी MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्या जागी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.https://maharashtramirror.com/ Pune News

पुण्यात विद्यार्थ्यांचा पेपरफुटीविरोधात मोर्चा

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बाब समोर आल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी पेपरफुटीविरोधात मोर्चा काढला. या आंदोलनात रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेतेही सहभागी झाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमकी जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

विवेक भीमनवार यांच्यावर रोहित पवारांचे गंभीर आरोप

रोहित पवार यांनी MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या पूर्वीच्या प्रशासकीय कारकिर्दीवरही आरोप केले. भीमनवार यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याचा दावा पवार यांनी केला.

“MPSC आयोगाचे अध्यक्षच वादग्रस्त आहेत. त्यांनी यापूर्वीच्या विभागातही अनेक गोंधळ घातले आहेत. विवेक भीमनवार यांची कारकीर्दच वादग्रस्त ठरली आहे. अनेकांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता,” असा दावा रोहित पवार यांनी केला.

भीमनवार संबंधित विभागात आयुक्त असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. या कथित गैरप्रकारांशी संबंधित पुरावे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच RTO विभागातील कथित गैरप्रकारांचाही त्यांनी उल्लेख केला.

“अजून ४० टक्के पुरावेच आम्ही सगळ्यांसमोर आणले आहेत. आम्ही लढणार आणि या माणसाचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी मांडली.

‘तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करा’

MPSCच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना रोहित पवार यांनी तुकाराम मुंढे यांचे नाव पुढे केले. अध्यक्षपदासाठी असलेल्या पात्रतेच्या निकषांचा आपण अभ्यास केला असून, त्या अटींनुसार तुकाराम मुंढे या पदासाठी पात्र ठरू शकतात, असा दावा त्यांनी केला.

“तुकाराम मुंढे यांना MPSC आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवा. मी सगळं चेक केलं आहे. ज्या अटी आहेत, त्यानुसार तुकाराम मुंढेसाहेब अध्यक्ष होऊ शकतात,” असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, विवेक भीमनवार यांच्याविरोधात कारवाई झाली नाही, तर मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्याचा दावाही त्यांनी केला.

आता औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते आणि MPSCच्या अध्यक्षपदाबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा