मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MP Narayan Rane : खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू

Narayan Rane Health Update : नियमित वैद्यकीय चाचणीसाठी भरती; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

V
Vivek

1 मिनिट वाचन

MP Narayan Rane : खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू

Narayan Rane Health Update : नियमित वैद्यकीय चाचणीसाठी भरती; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

मुंबई | भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे Naryan Rane यांना आज मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या जाणवत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

नियमित चाचणी की शस्त्रक्रिया?

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांना नियमित वैद्यकीय तपासणी (Routine Check-up) आणि हृदयाशी संबंधित उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. यापूर्वी मे 2022 मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सध्या त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाण्याची शक्यता असून, आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या जात आहेत.

"आता मी थकलोय…" राणेंचे ते भावनिक भाषण

नुकताच कोकण दौऱ्यावर असताना कणकवली येथे नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला होता. स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आयोजित या सोहळ्यात राणे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की,
"आता मी थकलो आहे, अजून किती काम करणार? याला काहीतरी मर्यादा असायला हवी. माझी दोन्ही मुले (नितेश आणि निलेश) आता समर्थ आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांना आता 'नांदा सौख्य भरे' असा माझा आशीर्वाद आहे."
त्यांच्या या विधानानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने राजकीय वर्तुळातून आणि त्यांच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा