मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MNS News : मनसेला मोठा धक्का! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन भोवले; अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai MNS Latest News : 'महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू देणार नाही' म्हणत अमित ठाकरेंनी केला लोकार्पण सोहळा; 'पहिली राजकीय केस' शिवछत्रपतींसाठी लढणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

MNS News : मनसेला मोठा धक्का! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन भोवले; अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai MNS Latest News : 'महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू देणार नाही' म्हणत अमित ठाकरेंनी केला लोकार्पण सोहळा; 'पहिली राजकीय केस' शिवछत्रपतींसाठी लढणार

नवी मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांचे सुपुत्र अमित ठाकरे Amit Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह सुमारे 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुतळा उद्धाटन आणि अमित ठाकरेंची भूमिका

या पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित ठाकरे यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही!"

पुतळा तब्बल चार महिने 'लोकार्पणासाठी नेता मिळत नाही' म्हणून फाटलेल्या कापडाने झाकून ठेवल्याबद्दल त्यांनी टीका केली. "महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल," असे त्यांनी जाहीर केले.

'पहिली राजकीय केस' शिवछत्रपतींसाठी

या कारवाईनंतर अमित ठाकरे यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आपले परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, "माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल."

निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणाऱ्यांना आणि शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही, हे महाराष्ट्रात घडणे लाजिरवाणे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनसेने केलेला हा आक्रमक पवित्रा आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई यामुळे नवी मुंबईतील राजकारण तापले आहे.

शेअर करा