मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road News : मिरा रोड येथील "केम छो" ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची रेड : बारबाला यांच्या साठी छुपा मार्ग

Mira Road Police Take Action On Bar : पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये केलेल्या कारवाईत मोठा खुलासा; 11 बारबालांना अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai,Navi Mumbai Municipal Corporation,unauthorized constructions,hotels,restaurants,bars

Mira Road Police Take Action On Bar : पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये केलेल्या कारवाईत मोठा खुलासा; 11 बारबालांना अटक

मीरा रोड :- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड येथील एका ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. Mira Road Police 'केम छो' KEM Cho Bar नावाच्या या ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला.Mira Road Latest Crime News

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत, बारमध्ये पोलिसांच्या येण्याची सूचना देण्यासाठी चक्क अलार्म बसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच, बारबालांना लपवण्यासाठी मेकअप रूमच्या मागे एक गुप्त खोली आणि तेथून पळून जाण्यासाठी लपवलेली वाट असल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांनी चावीने दरवाजा उघडल्यानंतर तिथे 11 बारबाला लपलेल्या आढळल्या. पोलिसांनी बाहेरूनही नाकाबंदी केल्यामुळे त्यांना पळून जाण्यात यश आले नाही. ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेला हा छुपा प्रकार पाहून पोलीसही चकित झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेअर करा