मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : स्वतःच रचला चोरीचा बनाव! मिरारोडमधील 2.94 लाखांच्या जबरी चोरीचा पर्दाफाश; महिला कर्मचाऱ्यासह तिघांना बेड्या

Nayanagar Police Latest News : नयानगर पोलिसांची 12 तासांत धडाकेबाज कामगिरी; कार्यालयातील रोकड हडपण्यासाठी आखला होता कट

V
Vivek

2 मिनिट वाचन

Bhiwandi Crime News

Nayanagar Police Latest News : नयानगर पोलिसांची 12 तासांत धडाकेबाज कामगिरी; कार्यालयातील रोकड हडपण्यासाठी आखला होता कट

मिरारोड :- मिरारोड येथील नयानगर परिसरात Nayanagar Police चाकूचा धाक दाखवून 2 लाख 94 हजार रुपयांची जबरी चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच, नयानगर पोलिसांनी या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा केला आहे. ही चोरी नसून, चक्क फिर्यादी महिला कर्मचाऱ्यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने रचलेला एक 'बनाव' असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह तिच्या दोन मित्रांना अटक करून चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. Mira Road Latest Robbery News

नेमकी घटना आणि बनाव

मिरारोड पूर्व येथील शांती शॉपिंग सेंटरमधील 'फायव्ह टेक इंटरनॅशनल' कंपनीत काम करणाऱ्या उजमा रियाज खान (वय 26) हिने 18 मार्च 2026 रोजी पोलिसांकडे तक्रार दिली होती. संध्याकाळी च्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी शॉपमध्ये शिरून, शटर आतून बंद केले आणि चाकूचा धाक दाखवून ड्रावरमधील 2 लाख 94 हजार रुपये लुटून नेले, असा बनाव तिने रचला होता. Nayanagar Police News

तपासाची चक्रे आणि गुन्ह्याचा उलगडा

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद हालचाली टिपल्या.

पोलिसांनी अवघ्या 12 तासांत माझगाव, मुंबई येथून मुजम्मिल अब्दुल हफिज सिद्दीकी (वय 20) याला ताब्यात घेतले.मुजम्मिलची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली. फिर्यादी उजमा खान हिनेच त्याला ऑफिसमध्ये मोठी रक्कम येणार असल्याची टीप दिली होती.

असा रचला होता कट

तपासात असे समोर आले की, उजमा खान, मुजम्मिल सिद्दीकी आणि त्यांचा मित्र मोहोम्मद ओवेश मोईददीन शेख (वय 26) यांनी 17 मार्च रोजी मुंबईत भेटून हा कट रचला होता. कार्यालयातील लाखो रुपये हडप करण्यासाठी चोरीचे नाटक करायचे आणि पोलिसांची दिशाभूल करायची, अशी त्यांची योजना होती. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीला गेलेली संपूर्ण 2.94 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार करत आहेत.

यशस्वी पथक

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (नवघर विभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर थोरात, पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

शेअर करा