मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Bhayandar Latest News : सावधान! 'फेक मेसेज'ने गमावलेले 98 हजार रुपये सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत; मीरा-भाईंदर पोलिसांची मोठी कामगिरी

Mira Bhayandar Latest Crime News : लिंकवर क्लिक करताच बँक खाते झाले होते रिकामे; 'नयानगर'मधील तक्रारदाराला सायबर सेलमुळे मिळाला दिलासा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Cyber Crime News

Mira Bhayandar Latest Crime News : लिंकवर क्लिक करताच बँक खाते झाले होते रिकामे; 'नयानगर'मधील तक्रारदाराला सायबर सेलमुळे मिळाला दिलासा

मिरा-भाईंदर | मोबाईलवर आलेल्या एका संशयास्पद 'फेक मेसेज'मुळे फसवणूक झालेल्या नागरिकाला मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलीस Mira Bhayandar Cyber Police ठाण्याने मोठा दिलासा दिला आहे. सायबर भामट्यांनी लंपास केलेले 98 हजार रुपये तक्रारदाराला सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.

नेमकी घटना काय?

नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शेख यांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज प्राप्त झाला होता. मेसेजमध्ये दिलेल्या एका लिंकवर त्यांनी क्लिक केले असता, त्यांचा मोबाईल 'अपडेट' होत असल्याचा मेसेज दिसला. मात्र, मोबाईल सुरळीत चालू झाल्यानंतर शेख यांना धक्काच बसला; त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 98 हजार रुपये कपात झाल्याचे मेसेज त्यांना मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

सायबर पोलिसांची तत्परता

तक्रार मिळताच सायबर पोलीस ठाण्याने 'NCCRP' पोर्टलवर (नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल) तातडीने नोंद केली. यामुळे शेख यांच्या खात्यातून गेलेली रक्कम ज्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती, ती तात्काळ 'फ्रीज' (गोठवण्यात) करण्यात आली. यामुळे सायबर चोरांना ती रक्कम काढता आली नाही.

न्यायालयीन प्रक्रियेनंतर रक्कम परत
थांबवलेली रक्कम कायदेशीररीत्या परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात अर्ज करण्याच्या सूचना दिल्या. सायबर पोलिसांनी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला. न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच फसवणुकीची पूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात आली.

या पथकाने बजावली कामगिरी

ही मोहीम पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रकाश सावंत, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाव्हळ, माणिकराव कतुरे, आणि त्यांच्या टीमने या प्रकरणात तांत्रिक कौशल्याचा वापर करून यश मिळवले.

शेअर करा