मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कोणासाठी थांबविली?

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कोणासाठी थांबविली?

Metro : मुख्यमंत्र्यांच्या निव्वळ घोषणाच : माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

पुणे, महाराष्ट्र मिरर

Metro: 'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असतानाही मेट्रो मार्गावर अजून धावू लागलेली नाही, ती कोणासाठी थांबविली आहे?' असा सवाल माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महामेट्रोला केला आहे. ( metro  mohan joshi criticis )

'मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होईल, अशी घोषणा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती. प्रत्यक्षात त्या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. १५ जुलैला पहिला टप्पा तरी सुरू होईल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. तेही नियोजन कोलमडले आहे,' असा आरोप मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. metro

Ravinanda Landmarks ला दणका ; ३६ लाखांच्या वसुलीसाठी ‘रिकव्हरी वॉरंट’

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी पुणे विमानतळावरील टर्मिनल विलंबाने कार्यान्वीत केले. त्याचप्रमाणे भाजपला मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी आणि गाजावाजा करण्यासाठी हिंजवडी-शिवजीनगर मेट्रो सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहिला जात आहे का?' अशी विचारणा मोहन जोशी यांनी केली आहे . Metro

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ: शरद पवार गट एनडीएच्या वाटेवर ?

'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्च २०२५ मध्ये धावू लागेल असे कामाचे मूळ वेळापत्रक होते. त्यानंतर सव्वा वर्ष उलटून गेले तरी मेट्रोची प्रतीक्षाच करावी लागत आहे. मार्चनंतर सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६, मे २०२६, १५ जून २०२६, १५ जुलै २०२६ अशा वेगवेगळ्या तारखा उदघाटनासाठी म्हणून जाहीर झाल्या. या निव्वळ घोषणाच ठरल्या. भाजप सरकारच्या पोकळ घोषणाबाजीचा आणि ढिसाळ कारभाराचा हा नमुना आहे,' असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. Metro

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा