मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maratha Arkshan News : ‘याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत’; मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक

Mumbai Maratha Arkshan Latest News : मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील एकाचा जुन्नरजवळ हार्ट अटॅकने मृत्यू, हळहळ व्यक्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maratha Arkshan News : ‘याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत’; मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक

Mumbai Maratha Arkshan Latest News : मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील एकाचा जुन्नरजवळ हार्ट अटॅकने मृत्यू, हळहळ व्यक्त

जुन्नर :- मराठा आरक्षणासाठी Maratha Arkshan अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांना आज एक मोठा धक्का बसला आहे. जुन्नरजवळ मोर्चातील एक आंदोलक, सतीश देशमुख, यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत याला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे.

आज सकाळी जरांगे पाटील शिवनेरीवर पोहोचले. तेथून मुंबईकडे निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सतीश देशमुख यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली. "आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत," असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकारने आता आरक्षण दिले, तर असे बळी जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

आठ तासांची परवानगी, पण जरांगे ठाम

मनोज जरांगे यांना पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनासाठी केवळ आठ तासांची परवानगी दिली आहे. जरी त्यांनी ही अट मान्य केली असली तरी, शिवनेरीवर बोलताना त्यांनी वेगळीच भूमिका घेण्याचे संकेत दिले. "मराठा समाजात खूप मोठ्या वेदना आहेत, हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतले पाहिजे. आमच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "न्यायालयाने सांगितले म्हणून आम्ही परवानगी घेतली, पण एका दिवसाची आंदोलनाची परवानगी ही मराठ्यांची चेष्टा आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलनाची परवानगी देऊ शकते, पण त्यांनी जाणूनबुजून फक्त एक दिवसाची परवानगी दिली."

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व अटी आणि शर्ती काढून टाकण्याची मागणी केली आहे. आता जरांगे आणि त्यांचे समर्थक प्रशासनाने दिलेली आठ तासांची वेळ पाळणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेअर करा