मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna News : आरक्षणही घेणार, तीन वर्षांचा हिशेबही करणार : जरांगे

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाच्या मागणीसोबतच आंदोलनाला विरोध करणाऱ्यांविरोधातही आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

आरक्षणही घेणार, तीन वर्षांचा हिशेबही करणार : जरांगे आंदोलनाला विरोध करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार; “ही वादळापूर्वीची शांतता”
आरक्षणही घेणार, तीन वर्षांचा हिशेबही करणार : जरांगे आंदोलनाला विरोध करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार; “ही वादळापूर्वीची शांतता”

Jalna News : आंदोलनाला विरोध करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार; “ही वादळापूर्वीची शांतता”


Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाच्या मागणीसोबतच आंदोलनाला विरोध करणाऱ्यांविरोधातही आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. “आम्ही सध्या शांत आहोत; मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे. गेल्या तीन वर्षांत खूप घाण-कचरा जमा झाला आहे. आता तो काढावा लागेल,” असा इशारा जरांगे यांनी दिला.https://maharashtramirror.com/ Jalna News

सध्याच्या शांत भूमिकेमागील कारण स्पष्ट करताना जरांगे म्हणाले, “प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतरही आम्ही काही काळ शांत राहिलो. याचा अर्थ आम्हीही काही गोष्टी शिकलो आहोत. ही वादळापूर्वीची शांतता आहे.” छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यांचा संदर्भ देत त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरची लढाईही लढावी लागणार असल्याचे सांगितले.https://maharashtramirror.com/ Jalna News

यापूर्वीच्या आंदोलनांप्रमाणेच आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. “समाजाच्या विरोधात कोण बोलत आहे, तसेच सरकार, राजकीय पक्ष किंवा नेत्यांकडून कोण काय बोलत आहे, हे पुढील तीन महिने पाहायचे ठरवले आहे. त्यानंतर पुढचे ऐकायला मिळेल,” असे जरांगे म्हणाले.

‘तीन वर्षे सहन केले, आता साफसफाई’


गेल्या तीन वर्षांत आंदोलनात अडथळे आणण्यात आले आणि बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करत जरांगे यांनी विरोधकांवर नाराजी व्यक्त केली. “समाजातील गोरगरीबांच्या लेकरांसाठी काम करतो म्हणून आम्हाला इतका त्रास देणार का? आम्ही तीन वर्षे सहन केले. आता हा घाण-कचरा काढू द्या. खूप मस्तवाल झाले आहेत हे लोक,” अशी टीका त्यांनी केली.

आंदोलनाची जबाबदारी असल्याने आतापर्यंत संयमाची भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आरक्षण कुठेच जात नाही आणि जाऊही देणार नाही. मात्र, गेल्या तीन वर्षांची घाण साफ करावीच लागेल,” असे सांगत जरांगे यांनी आगामी काळात आंदोलनाची भूमिका अधिक आक्रमक होण्याचे संकेत दिले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा