Jalna News : आरक्षणविरोधात षडयंत्र; गाफील राहू नका’‘१०-१५ दिवसांत पुराव्यानिशी आणि नावानिशी सगळं उघड करणार’; मनोज जरांगे यांचा इशारा
Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
2 मिनिट वाचन

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात आतून मोठे षडयंत्र रचले जात असून, समाजाने गाफील राहू नये, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या तीन महिन्यांपासून आपण शांत आहोत, याचा अर्थ लढ्यातून माघार घेतली किंवा संपलो असा नाही. येत्या १० ते १५ दिवसांत आरक्षणविरोधातील षडयंत्राचे धागेदोरे पुराव्यानिशी आणि नावानिशी समाजासमोर मांडणार, असा दावा जरांगे यांनी केला.https://maharashtramirror.com/ Jalna News
छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुटी मिळण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह समाजातील अंतर्गत मतभेद, अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तसेच अन्य सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही भूमिका मांडली. https://maharashtramirror.com/ Jalana News
‘आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही’
“सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, त्यांचे मनसुबे काय आहेत, याची मला माहिती आहे. माझ्यावर कितीही वैयक्तिक हल्ले करा किंवा आरोप करा; मराठा समाजातील लेकरांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही,” असे जरांगे यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मागणीला विरोध करणाऱ्या कथित षडयंत्रामागे कोण आहे, याची माहिती योग्य वेळी समाजासमोर आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विध्वंसक होण्यापेक्षा विद्वान व्हा’
मराठा समाजाने संयम राखण्याचे आवाहन करत जरांगे म्हणाले की, लढाई निर्णायक टप्प्यावर असून विजयाच्या जवळ पोहोचलो आहोत. समाजाला विचलित करण्याचे प्रयत्न होत असल्याने कार्यकर्त्यांनी संयमाने आणि विचारपूर्वक भूमिका घेणे आवश्यक आहे.
“प्रत्येक वेळी विध्वंसक होण्यापेक्षा विद्वान होणे गरजेचे आहे. संयम ठेवून योग्य वेळी अचूक निर्णय घ्यावा लागतो,” असे त्यांनी म्हटले.
‘तीन महिने कोणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही’
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांकडून झालेल्या टीकेवरही जरांगे यांनी भाष्य केले. काही जण आपण आरक्षणाच्या आंदोलनातून मागे हटल्याचे म्हणत आहेत, तर काहींनी आपल्यावर व्यक्तिगत टीका केली आहे. मात्र, या टीकेला आपण सध्या उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कोणी मला औरंगजेबाची उपमा दिली, कोणी शिव्या दिल्या तरी मला फरक पडत नाही. मी तीन महिने कोणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही. अंतर्गत वादात माझी ताकद वाया घालवायची नाही,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवणार असल्याचे सांगत, समाजाने संयम आणि एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.




